Ratnagiri News – मिरजोळे येथे जाळीत अडकलेला बिबट्या जेरबंद; वनविभागाची यशस्वी मोहीम
तालुक्यातील मिरजोळे, लक्ष्मीकांतवाडी परिसरात आज (01 मे 2026) सकाळी एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास एका लाकडाच्या माचाखालील जाळीत हा बिबट्या अडकल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. माजी सरपंच गजानन गुरव यांनी तातडीने या घटनेची माहिती वनविभागाला दिली. बिबट्या अडकल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच त्याला पाहण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
वनअधिकारी प्रकाश सुतार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. सुरक्षेच्या कारणास्तव वनविभागाने प्रथम जमावाला दूर पांगवले आणि त्यानंतर अत्यंत सावधगिरीने बिबट्याला जाळीतून सुरक्षितरीत्या बाहेर काढले. त्यानंतर पशुधन विकास अधिकारी डॉ. स्वरूप काळे आणि डॉ. रानभरे यांनी बिबट्याची सविस्तर वैद्यकीय तपासणी केली. वनविभागाच्या या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला असून ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
Comments are closed.