Missing Link Inauguration : फडणवीसांच्या हस्ते ‘मिसिंग लिंक’चे उद्घाटन; तिन्ही नेत्यांचा एकाच गाडीतून प्रवास
मुंबई : मुंबई ते पुणे किंवा पुणे ते मुंबई असा प्रवास करताना अनेकदा खंडाळा घाटात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असे. यावर तोडगा म्हणून महाराष्ट्र सरकारने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंकची योजना आणली. आज (1 मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मिसिंग लिंकचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महायुतीतील मंत्री तसेच अनेक नेते उपस्थित होते.
Comments are closed.