VIDEO: “मला वैभव सूर्यवंशीची खूप भीती…”, काइल जेमिसनचे सामन्यानंतरचे वक्तव्य; वाचा सविस्तर

वैभव सूर्यवंशीची विकेट किती महत्वाची असते हे त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना चांगलेच माहित आहे. आयपीएल २०२६ मध्ये शुक्रवारी (१ मे) झालेल्या सामन्यात त्याचा प्रत्यय आला. वैभवला बाद केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या काइल जेमिसनने ज्याप्रकारे जल्लोष केला, तो आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.५ चे उल्लंघन करणारा असल्याचे बीसीसीआयला आढळले. जेमिसनने केलेले आक्रमक सेलिब्रेशन यावरून वैभवची विकेट किती महत्वाची हे पुन्हा एकदा कळाले.

वैभवने जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. त्यानंतर त्याने अनेक जागतिक दर्जाच्या गोलंदाजांचा निर्भिडपणे सामना केला. हे पाहून जेमिसननेही त्याला वैभवची किती भीती वाटत होती, हे सामन्यानंतर सांगितले आहे.

सुरूवातीपासून मोठे शॉट्स खेळत चौकार-षटकार मारणाऱ्या वैभवने अनेकांची झोप उडवली आहे. सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना रंगला. आरआरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे यामध्येही वैभव धमाकेदार सुरुवात करणार का याकडे लक्ष होते आणि त्याने तसेच केले. वैभवने जेमिसनने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला, मात्र पुढच्याच चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. तो २ चेंडूत ४ धावा करत तंबूत परतला.

सामन्यानंतर आयपीएलने जेमिसनचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये तो म्हणाला, “मला नाही वाटत की मी कधी १५ वर्षांच्या मुलाला इतका घाबरलो असेन, मात्र सामन्यासाठी केलेले नियोजन कामी आहे.”

या सामन्यात मिचेल स्टार्कने हंगामातील पहिला सामना खेळताना प्रभावी कामगिरी केली. त्याने पहिल्याच षटकात यशस्वी जायस्वालला बाद केले. त्याने ४ षटकात ४० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसेच ४ षटकात जेमिसनने ४८ धावा देत एक विकेट घेतली. आरआरने कर्णधार रियान परागच्या ९० धावांच्या जोरावर २० षटकात ६ विकेट्स गमावत २२६ धावा केल्या.

प्रत्युत्तरात डीसीकडून केएल राहुलने धमाकेदार खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भुमिका पार पाडली. त्याने ४० चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांच्या सहाय्याने ७५ धावा केल्या. हा सामना डीसीने ५ चेंडू आणि ७ विकेट्स शिल्लक राखत जिंकला.

Comments are closed.