संघात जागा नाही… आयुष्यालाच संपलं! 19 वर्षीय महिला क्रिकेटपटूचा टोकाचा निर्णय, सगळेच हादरले, ने
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आज शनिवार 2 मे 2026 रोजी आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 साठी भारताच्या 15 सदस्यीय संघाची अधिकृत घोषणा करणार आहे. मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात होणाऱ्या या हाय-प्रोफाईल पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असतानाच, क्रिकेट विश्वातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.
निवड चाचणीत अपयश आल्याने पुदुच्चेरी येथील 19 वर्षीय महिला क्रिकेटपटू एंजल गंगवाणी हिने बुधवारी 29 एप्रिल रोजी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे क्रीडा विश्वात मोठी खळबळ उडाली असून, तरुण खेळाडूंवरील मानसिक दबावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
…अन् टोकाचे पाऊल उचलले
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एंजल ही मूळची चेन्नई येथील असून तिचे वडील जीएसटी (GST) विभागात अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ती पुदुच्चेरी येथे बीबीए (BBA) द्वितीय वर्षात शिकत होती. आपले क्रिकेटचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती थिलासपेट येथील एका कोचिंग सेंटरमध्ये सराव करत होती आणि त्यासाठी तिने सोक्कनाथनपेट येथे भाड्याने खोली घेतली होती.
बुधवारी रात्री आठच्या सुमारास ती सरावावरून आपल्या घरी परतली. त्यानंतर तिचे प्रशिक्षक कथिरवेल यांनी तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने ते काळजीत पडले. त्यांनी एंजलच्या घरी जाऊन पाहिले असता, ती छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. तिला तातडीने कथिराकामम येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
निवड न झाल्याने युवा महिला क्रिकेटपटूची आत्महत्या
एंजलच्या आत्महत्येमागे क्रिकेटमधील ‘रिजेक्शन’ किंवा निवड न होण्याचे दुःख कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. नुकत्याच पुदुच्चेरी महिला टी-20 क्रिकेट संघासाठी निवड चाचण्या पार पडल्या होत्या. एंजलने या चाचण्यांमध्ये मोठ्या आशेने सहभाग घेतला होता, मात्र अंतिम संघात तिचे नाव आले नाही.
तिच्या घरमालकाने आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संघ जाहीर झाल्यापासून ती प्रचंड तणावाखाली होती आणि कोणाशीही नीट बोलत नव्हती. व्यावसायिक अपयशाने तिला इतके ग्रासले की तिने आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग निवडला.
खेळाडूंचे मानसिक आरोग्य, एक गंभीर प्रश्न
या घटनेने तळागाळातील आणि देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या मानसिक आरोग्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट (क्रीडा मानसशास्त्रज्ञ) आणि मार्गदर्शकांची साथ मिळते. मात्र, एंजलसारख्या हजारो तरुण खेळाडूंसाठी क्रिकेट ही केवळ कारकीर्द नसून त्यांची ओळख असते. अशा वेळी मिळालेले अपयश त्यांना वैयक्तिक पराभव वाटू लागते.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.