Ratnagiri News – भोस्ते घाटात कारचा संरक्षण भिंतीला आदळून अपघात; चार जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

खेड तालुक्यातील भोस्ते घाट चढत असताना मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने जाणारी इर्टिगा कारवरील (एमएच 03 बी जे 2290 ) चालकाचे नियंत्रण सुटल्याने घाटालगत असलेल्या संरक्षण भिंतीवर कार आदळून अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी सकाळी 9:40 च्या सुमारास झाला. या अपघातात इर्टिगा कारचे नुकसान झाले आहे.

निकिता अनंत साळवी (३०),अश्वीनी अनंत साळवी (५८) , अनंत शंकर साळवी (६१) व अद्विक कृष्णा नवाले (५ ) रा.मालाड मुंबई अशी जखमींची नावे असून जखमींना जगतगुरु नरेंद्राचार्य नाणीजधाम २४ तास रुगणवाहीकेचे चालक सुरज हंबीर यांनी कळंबणी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.या घटनेतील जखमींवर उपचार सुरू असून अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.

Comments are closed.