Footwear : पायदुखी टाळण्यासाठी कशी असावी तुमची चप्पल?

पाय दुखणे ही एक सामान्य समस्या आहे. पण त्याची कारण ही व्यक्ती आणि प्रकृतीनुसार वेगवेगळी असतात. इतर कारणांव्यतिरिक्त सामान्यत शरीरात कॅल्शियमची, पाण्याची कमतरता असल्यास पाय दुखतात. पण या कारणांशिवाय तुम्ही पायात ज्या काही चपला, शूज, सँडल घालता त्यांची फिटींग जरी योग्य नसेल तरीही पाय दुखू शकतात.

कारणे –

चुकीच्या आकाराचे, उंच टाचांचे किंवा कडक तळवे असलेले शूज परिधान केल्याने पाय दुखण्याची समस्या वाढते.

उंच टाचांच्या, योग्य फिटिंग नसलेल्या चपला घालून जास्त वेळ उभे राहिल्यास, जास्त चालल्यास पायांच्या स्नायूंमध्ये ताण येतो आणि पाय दुखतात.

प घट्ट किंवा खूप सैल चप्पल पायांच्या रक्ताभिसरणावर परिणाम करते आणि पाय दुखण्यास सुरूवात होते.

सपाट चप्पल, चपलेचा तळ खूप कडक किंवा खूप मऊ असणे यामुळे टाचेवर दाब येतो. ज्यामुळे पायांत वेदना सुरू होतात.

हेही वाचा – Sleeve Style: प्रत्येक ड्रेससाठी परफेक्ट स्लीव्ह स्टाइल

खूप जुनी चप्पल असल्यास किंवा चप्पल घासली गेल्यास पायांना आधार मिळत नाही आणि पाय दुखतात.

योग्य चपला निवडण्यासाठी ..

शूज आपल्या पायाचा आकारात योग्यरित्या बसत असल्याची खात्री करावी.

शूज खरेदी करताना, संध्याकाळी किंवा रात्री खरेदी करावेत, कारण यावेळी पाय थोडे फुगतात आणि योग्य फिटिंग मिळते.

शूजमध्ये चांगले कुशिंग असणे आवश्यक आहे जेणेकरुन चालताना किंवा उभे राहताना पायावर कमी दाब पडेल.

चपलेची टाच मजबूत आणि स्थिर असावी. ज्यामुळे चालताना किंवा धावताना पायांवर जास्त भार पडणार नाही.

शूजला आतील बाजूस अतिरिक्त आधार किंवा इनसोल आहेत याची खात्री करावी. यामुळे पायांना आराम मिळतो.

नियमित चपला बदलाव्यात, कारण जुने आणि जीर्ण चपला, शूज वापरल्याने पाय दुखतात.

हेही वाचा – Saree Types: साडी, परंपरा आणि वैविध्याची ओळख

Comments are closed.