Ratnagiri News – संगमेश्वरमध्ये आरवली घाटात डंपर पलटला, अपघातात चालक जखमी; महामार्गावर वाहतूक कोंडी
संगमेश्वर तालुक्यातील आरवली घाटामध्ये सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास डंपर पलटला. स्वराज्य पेट्रोल पंपाजवळील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डंपर पलटी झाला. यात डंपर चालक जखमी झाला. सलीम तहिदुल्लाह खान (62) असे जखमी चालकाचे नाव आहे. चालकाच्या उजव्या हाताला, डोक्याला व उजव्या डोळ्याजवळ दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयगड ते लोटे मार्गावर आरवली घाटातील वळणावर अचानक डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि डंपर पलटी झाला. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच उपस्थितांनी तत्काळ जखमी चालकाला संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी चालकाला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात मोटार अपघात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
Comments are closed.