घरच्या बागेत लावा ‘या ‘ औषधी वनस्पती

आपल्याकडे लहान मुलांना सर्दी पडसे झाले की आजीच्या बटव्यातील औषधी दिली जायची. पण आताच्या पिढीला त्या बटव्यात असणाऱ्या औषधी वनस्पतींबद्दल फारशी माहीती नसल्याने अनेकजण मुलांना लहान सहान आजारासाठी गोळ्या औषध देतात. पण या औषधांचे शरीरावर साई़ इफेक्ठ्सही होतात. यामुळे लहान मुलचं नाही तर मोठ्या व्यक्तीही घरातील बागेत लावलेल्या या वनस्पतींचा वापर करून स्वतला आणि कुटुंबाला आजरांपासून दूर ठेवू शकतात. त्यासाठी कोणत्या औषधी वनस्पती तुम्ही तुमच्या कुंडीत किंवा बागेत लावू शकतात. त्या काम कसे करतात ते समजून घेतलेले बरे.

1. तुळस

सर्दी, खोकला आणि तापासाठी उपयोगी

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

पोटदुखी आणि अपचनावर मदत

2. कोरफड

भाजल्यावर किंवा जखमेवर लावल्यास आराम मिळतो

त्वचेसाठी खूप उपयुक्त

पोट साफ ठेवण्यास मदत

3. मिंट

अपचन, उलटी, मळमळ कमी करते

थंडावा देतो

डोकेदुखीत आराम

4. आले

खोकला आणि घशातील दुखणे कमी करते

पचन सुधारते

सर्दीवर घरगुती उपाय

5. ओवा

पोटदुखी, गॅस आणि अपचनासाठी उपयोगी

सर्दीवर वाफ घेण्यासाठी वापरतात

6. लेमनग्रास

ताप आणि सर्दीसाठी काढा बनवतात

ताण कमी करण्यास मदत

पचन सुधारते

7. गवती चहा

सर्दी-खोकल्यात आराम

शरीराला ताजेतवाने ठेवते

8. कडुलिंब

त्वचारोगांवर उपयोगी

जंतुनाशक गुणधर्म

रक्त शुद्ध करण्यास मदत

ही सर्व झाडे घरच्या कुंडीत किंवा बागेत सहज वाढतात
औषध म्हणून वापरताना मर्यादित प्रमाणात वापर करा
पण गंभीर आजारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Comments are closed.