पुद्दुचेरीचे मत सत्ताधारी पक्षाला आहे

मुख्यमंत्री रंगास्वामी यांच्या नेतृत्वात वाढीव यश

तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळ अशा तीन राज्यांमध्ये पसरलेल्या पुद्दुचेरी या छोट्या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीत तेथील मतदारांनी सत्ताधारी आघाडीलाच सलग दुसऱ्यांदा कौल दिला आहे. या प्रदेशात विधानसभेच्या 30 जागा असून त्यांच्यापैकी 20 जागांवर यशस्वी होत या आघाडीने घसघशीत दोन तृतियांशापेक्षाही अधिक बहुमत मिळविले आहे. मागच्या निवडणुकीपेक्षाही या आघाडीने या निवडणुकीत अधिक सरस कामगिरी नोंदविल्याचे दिसून येत आहे.

या प्रदेशात 9 एप्रिलला मतदान झाले होते. 90 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान करुन येथील मतदारांनी या प्रदेशासाठी नवा विक्रम केला होता. शनिवारी सकाळी 8 वाजता मतगणनेला प्रारंभ झाल्यानंतर प्रारंभापासूनच सत्ताधारी आघाडीने प्रतिस्पर्धी आघाडीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. रात्री 8 च्या आसपास सर्व परिणाम हाती आले, तेव्हा सत्ताधारी आघाडीने 20 जागा मिळवत आपली परिस्थिती मागच्या निवडणुकीपेक्षा अधिक सुधारत विजय प्राप्त केला आहे.

विशेष उल्लेख…

ड अद्रमुकने उघडले खाते

सत्ताधारी आघाडीतील अण्णा द्रमुक पक्षाचे उमेदवार अनबालागन यांनी औपालम मतदारसंघात 1 हजार 26 मतांनी निसटता विजय मिळवत पक्षाचे खाते उघडले. गेल्या निवडणुकीत या पक्षाला एकही जागा मिळवता आली नव्हती.

मुख्यमंत्री रंगास्वामी विजयी

पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांनी थट्टानचवडी या आपल्या पारंपरिक मतदारसंघात विजय मिळविला आहे. त्यांनी नेयाम मक्कळ कळघम या पक्षाने प्रतिस्पर्धी ई. विनायकम यांच्यावर 4 हजार 441 मतांनी विजय मिळविला आहे.

ड टीव्हीकेचा चंचुप्रवेश

तामिळनाडूत आश्चर्यकारक यश मिळविलेल्या टीव्हीके या पक्षाने पुद्दुचेरीतही चंचुप्रवेश केला आहे. या पक्षाने काही अपक्षांनाही समर्थन दिले होते. त्यांच्यापैकी 2 अपक्षांचा विजय झाला आहे. तर तीन जण पराभूत झाल्याचे दिसून येत आहे.

ड काँग्रेस आघाडीला झटका

गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत काँग्रेस आघाडीची कामगिरी बिघडल्याचे दिसून येते. मतगणना पूर्ण झाल्यानंतर या आघाडीला केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला स्वत:ला चार जागा मिळाल्या आहेत.

ड भाजपची कामगिरी सरस

गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला चार जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत या पक्षाने अधिक प्रगती केली असून 7 जागा मिळविल्या आहेत. त्यामुळे आता या प्रदेशात या पक्षाला अधिक महत्वाचे स्थान मिळणे शक्य आहे.

ड नम:शिवायम् यांचा विजय

पुद्दुचेरीतील भारतीय जनता पक्षाचे महत्वाचे नेते ए. नम:शिवायम् यांनी मन्नाडीपेट मतदारसंघातून मोठा विजय मिळविला आहे. त्यांनी काँग्रेसचे टीपीआय सेलवामे यांचा 6 हजार 110 मतांनी पराभव करत आपली मांड घट्ट केली आहे.

ड एआयएनआरसीला सर्वाधिक जागा

मुख्यमंत्री ए. रंगास्वामी यांच्या एआयएनआरसी यांच्या पक्षाने या निवडणुकीतही गेल्यावेळेप्रमाणे सर्वाधिक जागा मिळविल्या आहेत. या पक्षाचे एकंदर 10 उमेदवार विजयी झाले आहेत. तर युतीतील भारतीय जनता पक्षाला 6 जागा प्राप्त आहेत.

तुलनात्मक पक्षीय बलाबल  एकंदर जागा 30

आघाडी             2021 निवडणूक               2026 निवडणूक

रालोआ             16 (43.65 टक्के)            18 (45.68 टक्के)

काँग्रेस आघाडी       09 (42.48 टक्के)          07 (41.68 टक्के)

अपक्ष, इतर         05 (13.87 टक्के)            05 (12.68 टक्के)

Comments are closed.