आयपीएलमध्ये 7 कोटी कमावणाऱ्या खेळाडूने सलग दुसऱ्यांदा जिंकली बंगालची निवडणूक, अशाप्रकारे संपली कारकिर्द

बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी (४ मे) जाहीर झाला, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोठा विजय मिळवला. आयपीएलमधून ७ कोटींपेक्षा अधिक कमाई करणाऱ्या एका खेळाडूनेही बंगाल निवडणूकीत भाजपला जागा मिळवून दिली आहे. आयपीएलने अनेक खेळाडूंना कोट्याधीश बनवले. त्यांच्यापैकीच एक भारतीय क्रिकेटपटू आता राजकिय क्षेत्रातही आपले वर्चस्व गाजवत आहे. माजी भारतीय वेगवान गोलंदाज अशोक डिंडा त्याच्या गोलंदाजीच्या शैलीमुळे चर्चेत राहिला. आता तो भारतीय क्रिकेटचा सदस्य नसून भारतीय जनता पक्षाचा एक अनुभवी खेळाडू आहे.

सोमवारी बंगाल विधानसभेच्या २९३ जागांचे निकाल जाहीर झाले, ज्यामध्ये भाजपने दणदणीत विजय मिळला. यामध्ये भाजपने २०६ जागा जिंकल्या, त्यापैकी डिंडाच्या एका जागेचा समावेश आहे. त्याने पश्चिम बंगालमधील मोयना मतदारसंघ १६,२४१ मतांनी जिंकला. त्याने बंगालमध्ये सलग दुसऱ्यांदा ही जागा जिंकली आहे.

डिंडा २००८ ते २०१७ दरम्यान पाच आयपीएल संघांकडून खेळला. आपल्या नऊ वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत त्याने एकूण ७.६३ कोटी रुपयांची कमाई केली. त्याने शेवटचा हंगाम २०१७ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला होता, तेव्हा त्याला ५० लाख रुपये मिळाले होते. २०१८ च्या आयपीएल लिलावात त्याला कोणीही विकत घेतले नाही, त्यामुळे त्याच्या आयपीएल कारकिर्दीचा शेवट झाला. तसेच त्याने २०२१ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

राजकारणात प्रवेश करण्याआधी डिंडाने भारतीय संघासाठी उत्तम कामगिरी केली. त्याने २१ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २९ विकेट्स घेतल्या. आयपीएलच्या पाच हंगामात मिळून त्याने ७८ सामने खेळताना ६९ विकेट्स घेतल्या.

डिंडा कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएल पदार्पण केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स, पुणे वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघांकडून खेळला. तो पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समधील एक प्रमुख गोलंदाज राहिला असून त्याचा इकॉनॉमी रेट ८.२० होता.

Comments are closed.