कतारच्या हद्दीतून आपत्कालीन संदेश पाठवला अन् संपर्क तुटला, अमेरिकेच्या हवाई दलाचे विमान बेपत्ता
कतारच्या हद्दीतून अमेरिकन हवाई दलाचे विमान अचानक बेपत्ता झाले आहे. आखाती देशांत तणाव वाढत असतानाच विमान बेपत्ता झाले. आपत्कालीन संदेश पाठवल्यानंतर विमान रडारवरून गायब झाले. हे विमान संयुक्त अरब अमिरातीमधील अल धाफ्रा हवाई तळावर तैनात होते. तसेच मध्य-पूर्वेतील लष्करी कारवायांमध्येही हे विमान सहभागी होते.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन हवाई दलाचे KC-135 हे विमान बेपत्ता झाले आहे. हे विमान कतारच्या हद्दीतून ताज होते. यादरम्यान, विमानाने ‘7700’ असा आपत्कालीन संदेश दिला. विमानाने काही वेळ घिरट्या घातल्या आणि नंतर लँडिंगचा प्रयत्न करत होते, मात्र संपर्क तुटला.
KC-135 स्ट्रॅटोटँकर हे चार टर्बोफॅन इंजिनांनी सुसज्ज असे लष्करी विमान आहे. याचा उपयोग हवेतच इंधन भरण्यासाठी केला जातो. हे विमान बऱ्याच काळापासून अमेरिकन हवाई दलाच्या कारवायांचा एक भाग आहे. हे विमान लढाऊ विमाने, बॉम्बर विमाने आणि इतर लष्करी विमानांना हवेत टिकून राहण्यास मदत करते. तसेच प्रवासी आणि मालवाहतुकीसह हवाई वैद्यकीय बचाव मोहिमांना साहाय्य करते.
Comments are closed.