पाकिस्तानने 50 वर्षांनी दिली मद्य निर्यातीला परवानगी; कर्जात बुडाल्यामुळे घेतला निर्णय, काही निवडक देशांना पाठविले मद्य
कर्जात आपंठ बुडालेल्या पाकिस्तानने तब्बल 50 वर्षांनी मद्यनिर्यात सुरू केली आहे. पाकिस्तानातील एकुलती एक मद्य उत्पादक पंपनी ‘मरी ब्रुअरी’ने ब्रिटन, जपान, पोर्तुगाल आणि थायलंड इत्यादी देशांमध्ये बिअर आणि इतर प्रकारचे मद्य निर्यात केले आहे.
पाकिस्तानवर 138 अब्ज डॉलरपेक्षा जास्त इतर देशांचे कर्ज आहे. पाकिस्तानचे उत्पन्न 40 अब्ज डॉलर असून खर्च 58 अब्ज डॉलरच्या आसपास आहे. उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त असल्यामुळे पाकिस्तान कर्जाच्या ओझ्यात आपंठ बुडाला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी मद्य निर्यातीचा पर्याय विचाराधीन होता. गेल्या वर्षी मद्यनिर्यातीला परवानगी देण्यात आली होती.
कशामुळे मद्यनिर्यात होती बंद?
पाकिस्तानात इस्लामिक नियमांचा हवाला देत 50 वर्षांपूर्वी वर्ष 1977 मध्ये मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली होती. त्यात बिगरमुस्लिमांना काही प्रमाणात सूट आहे. ‘मरी ब्रुअरी ही पाकिस्तानातील सर्वात जुनी मद्य उत्पादक पंपनी आहे. ब्रिटिश सैनिकांसाठी इंग्रज व्यावसायिकांनी तिची स्थापना केली होती. ही पंपनी विना अल्कोहोलिक पेयदेखील उत्पादन करते.
Comments are closed.