विषबाधामुळे मृत्यू नव्हे…कलिंगड खाऊन मृत्यू प्रकरणी सर्वात मोठी माहिती, 4 जणांच्या मृत्यूचं क

टरबूज मृत्यू प्रकरण मुंबई कौटुंबिक बातम्या: मुंबईतील पायधूनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील (Dokadia Family Pydhonie) चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना (Watermelon Death Mumbai) समोर आली होती. या प्रकरणी आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील जेजे रुग्णालय येथे डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणी ‘डेथ ऑडिट’ सुरू करण्यात आले आहे. मृत्यूचे नेमके कारण, उपचाराची वेळ आणि प्रक्रियेत काही विलंब झाला का याचा तपास केला जात आहे. प्राथमिक तपासात अन्न विषबाधा नाकारण्यात आली असून, मृतांच्या शरीरात विषारी रसायनांचे अंश आढळले आहेत. फॉरेन्सिक अहवालातही याची पुष्टी झाली आहे. या ऑडिटमध्ये रुग्णांचे मेडिकल रेकॉर्ड, दाखल होण्याची वेळ, लक्षणे आणि दिलेला उपचार यांचा सखोल आढावा घेतला जात आहे. तसेच सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांकडून दिलेला उपचार योग्य होता का, आणि रुग्णांना वेळेत मोठ्या रुग्णालयात हलवले गेले का, याचाही तपास होणार आहे.

मायक्रोबायोलॉजी आणि पॅथॉलॉजी अहवालांची प्रतीक्षा- (Watermelon Death Case)

26 एप्रिल रोजी अल्पावधीत सर्व रुग्णांना समान लक्षणांसह दाखल करण्यात आले होते. काहींना आधी इतर रुग्णालयात उपचार देऊन नंतर जेजे रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र सर्वांचा मृत्यू झाला. मायक्रोबायोलॉजी आणि पॅथॉलॉजी अहवालांची प्रतीक्षा असून, त्यावरून मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, पोलिसही या अहवालावर आधारित पुढील कारवाई करणार असून, उपचार प्रक्रियेत काही त्रुटी आढळल्यास दोषींवर कारवाई केली जाईल.

सामान्य अन्नदूषिततेमुळे इतक्या वेगाने मृत्यू होणे दुर्मिळ- (Watermelon Death Mumbai)

सदर घटनेत आई-वडील आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींचा समावेश असून, रविवारी उपचारादरम्यान जेजे रुग्णालय येथे त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी जेजे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक निष्कर्षांनुसार अन्न विषबाधेची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सामान्य अन्नदूषिततेमुळे इतक्या वेगाने मृत्यू होणे दुर्मिळ असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणात विषारी घटक किंवा इतर कारणांचा समावेश असण्याची शक्यता तपासली जात असून, फॉरेन्सिक अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे. (Watermelon Death Mumbai)

नेमकं प्रकरण काय? (Watermelon Death Mumbai Pydhonie Family)

डोकाडिया कुटुंबीयांनी 25 एप्रिल रोजी रात्री कलिंगड खाल्ले. कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांनाही उलट्या, चक्कर आणि पोटदुखी यांसारखी लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर 26 एप्रिलला त्यांची प्रकृती अधिकच खालावली. डोकाडिया यांच्या दोन्ही मुली बेशुद्धावस्थेत आढळल्या. यानंतर चौघांनाही तात्काळ जेजे रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेल्यानंतर एका मुलीला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. त्यानंतर काही तासांनी दुसऱ्या मुलीचाही मृत्यू झाला. दुसऱ्या मुलीच्या मृत्यूनंतर काही वेळात पालकांचाही मृत्यू झाला. सदर घटनेमुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित बातम्या:

Watermelon Death Mumbai Pydhonie Family News: कलिंगड खाऊन कुटुंब संपलं; चौकशीनंतर बाहेर येताच दुकानदाराचा डोक्यावर हात, म्हणाला…

Watermelon Death Mumbai Pydhonie Family News: बिर्याणी आणि कलिंगड खाऊन संपूर्ण कुटुंब संपलं; मृतांच्या शरीरात आढळला हादरवणारा पदार्थ

आणखी वाचा

Comments are closed.