‘मी आज त्यांच्यामुळे इथे उभा आहे’ मेट गाला 2026 डेब्यूनंतर करण जोहरने या सुपरस्टारला दिलं श्रेय – Tezzbuzz

करण जोहर हा एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहे. त्याने आता पर्यत अनेक उत्तम चित्रपटांची निर्मीती केली आहे. आणि ते गाजले तसेच आजही प्रेक्षक त्या चित्रपटाना विसरले नाहीत. तर आता करण जोहर एका कारणांमुळे चर्चेत आले आहे. करण जोहरने मेट गाला 2026 मधील पदार्पणाने केले आहे. तसेच त्याने त्याच्या पहेरावाने सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याने रेड कार्पेटवर पाऊल ठेवताच सर्वाचे नजर त्यावर खिळल्या होत्या.

प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरने त्याच्या मेट गाला मध्ये पहेराव केलेला प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला होता, ज्यासोबत त्याने एक केप घातली होती. त्याच्या पोशाखावर भारतीय कलेचे जनक राजा रवी वर्मा यांची सुंदर चित्रे होती. राजा रवी वर्मा यांच्या कलेला समर्पित असलेल्या या अनोख्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, करण जोहरने त्याचा जिवलग मित्र आणि बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानबद्दलही भाष्य केले, ज्याने 2025 मध्ये मेट गालामध्ये पदार्पण केले होते.

एका दिलेल्या मुलाखतीत, करण (karan)जोहरने शाहरुख खानसोबतच्या त्याच्यातील उत्तम नात्याबद्दल सांगितले. शाहरुख खानने 2025 मध्ये मेट गालामध्ये पदार्पण केले होते. तर आता करण जोहरने यावर्षी तेच केले. शाहरुख खानच्या पावलावर पाऊल ठेवताना कसे वाटते, असे विचारल्यावर त्याने उत्तर दिले,  यावर करण जोहरने किंग खानसोबतच्या आपल्या दीर्घकालीन संबंधांबद्दल आणि सर्जनशील सहकार्याबद्दल बोलताना स्पष्ट केले की, त्याने एक चित्रपट निर्माता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात शाहरुख खानसोबत केली. त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात करण्याचे श्रेय शाहरुख खानला दिले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

प्रसिद्ध अभिनेता संतोष नायर यांचा रस्ते अपघातात मृत्यू

Comments are closed.