नातवाला खाऊ आण्यासाठी पाठवलं, पहिले नातीचे, मग स्वत:च्या अंगावरील कपडे काढले, पर्वती परिसरातील
पुणे पर्वती क्राईम न्यूज: पुण्यातील पर्वती पायथ्याजवळील (Pune Parvati Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली. 70 वर्षीय आजोबाने सख्ख्या 9 वर्षांच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांना मुलीचा आरडाओरडा ऐकू आल्यानंतर ते घराजवळ पोहोचले आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या नराधम आजोबावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Parvati Crime News)
सदर प्रकरणी चिमुकलीवरील अनर्थ कसा टळला याबाबत माहिती समोर आली आहे. नातू आणि नात आरोपी आजोबाला भेटण्यासाठी आले होते. आरोपीने नातूला पैसे दिले आणि खाऊ खाऊन ये असं सांगितलं. नंतर आरोपीने नातीच्या अंगावरील कपडे काढले आणि स्वतःच्या अंगावरीलही कपडे काढले. आरोपी पत्र्याच्या घरात राहिला असल्याने एका महिलेचे लक्ष गेलं आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला. (Pune Parvati Crime News)
पोलिसांनी कोणती माहिती दिली? (Pune Parvati Crime News)
पर्वती पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक राजेंद्र सहाणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. काल (5 मे) रात्री 9.30 वाजता एक माहिती मिळाली की, एका आरोपीला लोकांनी पकडून ठेवलं होतं ज्याने स्वत:च्या नातीवर अत्याचार केल्याचा प्रयत्न केला. हा त्या मुलीचा सख्खा आजोबा आहे, जो 70 वर्षांचा आहे. त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळाची प्रकृती चांगली असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलं आहे. सध्या परिस्थिती शांत आहे . पुढील कारवाई आम्ही करत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सदर घटनेनंतर नागरिकांचं पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलन- (Pune Parvati Crime News)
सदर प्रकार नागरिकांनी पाहिल्याने अनर्थ टळला. नागरिकांमुळे पीडितेची नरधमाच्या तावडीतून सूटका झाली. यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. मात्र आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत स्थानिकांनी पर्वती पोलीस स्थानकाबाहेर गर्दी केली. संतप्त नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. मोठ्या प्रयत्नानंतर पोलिसांनी नागरिकांना शांत केलं.
राज्यातील नराधमांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्वरीत शक्ती कायद्याचा वटहुकूम काढावा- रोहित पवार
राज्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटनांना कोणतीही वेसन लागत नसून नसरापूर, केज, पालघर येथील घटना ताज्या असताना रात्री पुन्हा पुण्यात पर्वती इथं एका आजोबाकडूनच नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना घडली. राज्यात कुठं ना कुठं दररोजच घडणाऱ्या या घटना चीड आणणाऱ्या आहेत, असं राष्ट्रवादी शरद पवाग गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले. राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित राहिलेल्या नाहीत आणि सरकार बाराही महिने निवडणूक, प्रचार आणि जल्लोष यात मग्न आहे. निवडणुकीतील टार्गेटप्रमाणे सरकारने असा काही आकडा फिक्स केला आहे का की अजून एवढ्याएवढ्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर आम्ही शक्ती कायदा आणणार? माझी सरकारकडं मागणी आहे की, याबाबत तातडीने विशेष अधिवेशन बोलवावं किंवा ते शक्य नसेल तर राज्यातील नराधमांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्वरीत शक्ती कायद्याचा वटहुकूम काढावा, असं रोहित पवार म्हणाले.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.