राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित राहिलेल्या नाहीत आणि सरकार निवडणूक, प्रचार अन् जल्लोषोत मग्न, रोहित पवारांचा संताप
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 65 वर्षीय नराधमाने चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच असाच एक प्रकार पुण्यातील पर्वती येथे घडला. 50 वर्षीय नराधमाने 9 वर्षांच्या बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क नागरिकांमुळे ही बालिका नराधमाच्या तावडीतून सुटली. यानंतर संतप्त लोकांनी रास्ता रोको करत प्रशासनाला जाब विचारला. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात अल्पवयीन मुलींना टार्गेट केल्याचे दिसून येत असून यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर हल्ला चढवला आहे.
रोहित पवार यांनी बुधवारी एक्सवर पोस्ट करत संताप व्यक्त केला. राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित राहिलेल्या नाहीत आणि सरकार निवडणूक, प्रचार अन् जल्लोषोत मग्न असल्याची टीका रोहित पवार यांनी केली. तसेच निवडणुकीतील टार्गेटप्रमाणे सरकारने असा काही आकडा फिक्स केला आहे का की अजून एवढ्याएवढ्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर आम्ही शक्ती कायदा आणणार? असा बोचरा सवालही उपस्थित केला.
राज्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटनांना कोणतीही वेसन लागत नसून नसरापूर, केज, पालघर येथील घटना ताज्या असताना रात्री पुन्हा पुण्यात पर्वती इथं एका आजोबाकडूनच नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना घडली. राज्यात कुठं ना कुठं दररोजच घडणाऱ्या या घटना चीड आणणाऱ्या आहेत. राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित राहिलेल्या नाहीत आणि सरकार बाराही महिने निवडणूक, प्रचार आणि जल्लोष यात मग्न आहे, असे रोहित पवार म्हणाले.
पुण्यात आणखी एक संतापजनक घटना, 50 वर्षांच्या नराधमाचा बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न
निवडणुकीतील टार्गेटप्रमाणे सरकारने असा काही आकडा फिक्स केला आहे का की अजून एवढ्याएवढ्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर आम्ही शक्ती कायदा आणणार? माझी सरकारकडे मागणी आहे की, याबाबत तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे किंवा ते शक्य नसेल तर राज्यातील नराधमांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्वरीत शक्ती कायद्याचा वटहुकूम काढावा, असेही रोहित पवार यांनी म्हटले.
राज्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटनांना कोणतीही वेसन लागत नसून नसरापूर, केज, पालघर येथील घटना ताज्या असताना रात्री पुन्हा पुण्यात पर्वती इथं एका आजोबाकडूनच नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना घडली. राज्यात कुठं ना कुठं दररोजच घडणाऱ्या या घटना चीड आणणाऱ्या…
– रोहित पवार (@RRPSpeaks) 6 मे 2026
राज्यातील महिला/मुलींवर अत्याचाराच्या मालिकेतील आणखी एक घटना… अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात अवघ्या 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची गंभीर आणि संतापजनक घटना घडली. नसरापूर, केज, पालघर, पर्वती अशा एकामागोमाग एक अशा अनेक घटना घडत आहेत याचा अर्थ गुन्हेगारांना कायद्याचा तसूभरही धाक राहिला नाही. सरकार अजून किती चिमुकल्यांचा बळी जाऊ देणार आहे? सरकारला आता तरी जाग येईल की नाही? सरकारला मायबाप म्हणलं जातं तर तत्काळ एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवून शक्ती कायदा का अमलात आणला जात नाही? किंवा वटहुकूम का काढला जात नाही? असा सवालही अन्य एका पोस्टद्वारे रोहित पवार यांनी केला.
राज्यातील महिला/मुलींवर अत्याचाराच्या मालिकेतील आणखी एक घटना..
अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात अवघ्या १० वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची गंभीर आणि संतापजनक घटना घडली. नसरापूर, केज, पालघर, पर्वती अशा एकामागोमाग एक अशा अनेक घटना घडत आहेत याचा अर्थ गुन्हेगारांना कायद्याचा…– रोहित पवार (@RRPSpeaks) 6 मे 2026
Comments are closed.