Mumbai News – मुंबई विमानतळावरील विमानसेवा 6 तासांसाठी स्थगित राहणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मान्सूनपूर्व देखभालीच्या कामासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा गुरुवारी 7 मे रोजी सहा तासांसाठी बंद राहणार आहे. धावपट्टी 09/27 आणि धावपट्टी 14/32 या सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत बंद राहतील, असे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पावसाळ्यादरम्यान सुरक्षित आणि अखंडित विमानसेवा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मुंबई आंतरराष्ट्रीय मान्सूनपूर्व देखभालीच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. दोन्ही कार्यरत धावपट्ट्यांवर देखभालीचे काम हाती घेणार आहे. यामुळे या कालावधीत विमानतळाचे कामकाज तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहे. विमानांच्या वेळापत्रकात आवश्यक ते बदल करता यावे यासाठी विमान कंपन्यांना याबाबत आधीच माहिती देण्यात आली होती, असे विमानतळ प्रशासनाने सांगितले.

Comments are closed.