धक्कादायक! हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून छळ, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
अहिल्यानगर वार्ता: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहातामध्ये धक्कादायक घटना गडली आहे. हुंड्यासाठीच्या छळाला कंटाळून विवाहितेनं विहिरीत उडी घेऊन आपली जिवनयात्रा संपवली आहे. राहाता तालुक्यातील एकरुखे इथं ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रिया शुभम ढगे ( वय 23 ) अस मृत विवाहितेचं नाव आहे. घराच्या बांधकामासाठी चार लाख रुपयांच्या मागणीसाठी सासरकडून विवाहितेचा सतत छळ सुरु होता. या प्रकरणी पती शुभम ढगे, सासरा राजेंद्र ढगे आणि सासू प्रतिभा ढगे ( सर्व राहणार को-हाळे , तालुका – राहाता , अहिल्यानगर ) यांच्या विरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करम्यात आली आहे. तिघांनांही पोलिसांनी अटक केली आहे.
2024 ते 2026 दरम्यान विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरु असल्याची माहिती मिळत आहे. छळ सहन न झाल्याने महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सगळं सासुमुळं झालं, नवऱ्यानं माझ्यावर कधीच प्रेम केल नाही, मृत्यूपूर्वी लिहेलं पत्र पोलिसांच्या हाती दरम्यान, मृत्यूपूर्वी विवाहितेनं एक पत्र लिहलं आहे. यामध्ये तिने कुटुंबातील व्यक्तींवर आरोप केले आहेत. तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं, पण आता मला काहीच नको. मी खूप सहन केलं आहे. मला माझी श्रेया माझा जवळ नाही. तिला खुप मिस करते पण ती माझ्याकडे येणार नाही. माझा नवरा शुभम, मी त्याच्यावर खूप प्रेम केलं, पण त्याने कधीच माझ्यावर तसं प्रेम केलं नाही. त्याचं प्रेम फक्त त्याच्या कुटुंबावर आहे. आज सगळं काही माझ्या सासूमुळे झालं आहे. त्यांना फक्त आमचं भांडण कसं होईल हेच पाहिजे होतं. ताई, श्रेयाची काळजी घे. श्रेयाला मी तुझ्यावर सोपवून जाते. आज जगामध्ये मी नाही, पण मी शुभमवर प्रेम करत राहील. माझी श्रेया मला “मम्मी” म्हणायची. एक महिना झाला तिला पाहिलंही नाही. खुप मिस करतेय श्रेयाला असा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. सॉरी श्रेया… तुझ्यासाठी मी काहीच करू शकले नाही. आज सगळे बोलत आहेत की मी चूकी केली आहे, पण मी चोरी नाही केली. अक्काचे पैसेही नाही घेतले.मला नोकरी करायची होती, पण घरचे नाही बोलले. फक्त आता कोणालाही टेंशन नाही द्यायचे.
शुभमला सांगा, करा मजा आता मी तुमच्या लाईफ मधून गेले आहे. माझी शेवटची एकच इच्छा एकच आहे. माझ्या श्रेयाचा सांभाळ कर ताई. आता मला काहीच नको आहे. सॉरी…Love you Shreya… असा पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.