Ratnagiri News – कोकणनगर ते चर्मालय दरम्यानच्या अतिक्रमणांवर नगरपरिषदेचा हातोडा; 100 हून अधिक दुकाने जमीनदोस्त

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रत्नागिरी नगरपरिषदेने आज शहरात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवत कोकणनगर ते चर्मालय दरम्यानच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा फिरवला. या मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अनधिकृत दुकाने आणि टपऱ्यांचे जाळे निर्माण झाले होते. आज (06 मे 2026 ) सकाळी जेसीबीच्या सहाय्याने सुरू झालेली ही कारवाई सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होती. नगरपरिषदेच्या या धडक कारवाईत 100 हून अधिक अनधिकृत टपऱ्या आणि दुकाने पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली असून, यामुळे परिसरातील रस्ते मोकळे झाले आहेत.

या कारवाईमागे महावितरणच्या प्रलंबित कामाचे महत्त्वाचे कारण असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोकणनगर ते चर्मालय या भागातून महावितरणची उच्चदाब भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्यात येणार आहे. मात्र, रस्त्याशेजारील अतिक्रमणांमुळे या कामात अडथळे येत होते. भूमिगत वाहिनीच्या सुरक्षित आणि तातडीच्या कामासाठी ही अतिक्रमणे हटवणे अत्यावश्यक होते. नगरपरिषदेच्या या आक्रमक भूमिकेमुळे शहरातील अन्य भागांतील अतिक्रमणधारकांचेही धाबे दणाणले आहेत.

Comments are closed.