शपथविधीपूर्वीच थलापती विजय अडचणीत; 2015 मधील घटनेवर गुन्हा दाखल करण्याची हायकोर्टात मागणी
मुंबई : तमिळनाडूमध्ये सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच TVK प्रमुख थलापती विजय (Thalapathy Vijay) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या विरोधात कथित आयकर अनियमिततेप्रकरणी FIR दाखल करण्याची मागणी करत मद्रास हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे शपथविधीपूर्वीच विजय यांच्या राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या याचिकेला हायकोर्टाच्या रजिस्ट्रारकडून क्रमांक देण्यात आला असून लवकरच या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
Vijay Income Tax Case : ‘पुली’ चित्रपटाशी संबंधित वाद
ही याचिका 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या Puli या चित्रपटाशी संबंधित आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आयकर विभागाने विजय यांच्याशी संबंधित ठिकाणी छापे टाकले होते. या कारवाईदरम्यान काही आर्थिक अनियमिततेचे संकेत मिळाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
High Court Hearing On Vijay: सुनावणीची शक्यता
याचिका सुरुवातीला स्वीकारण्यात आली नव्हती. मात्र मुख्य न्यायाधीश सुशांत अरविंद धर्माधिकारी (Sushrut Arvind Dharmadhikari) आणि न्यायमूर्ती जी अरून मुरुगन (G. Arul Murugan) यांच्या खंडपीठाने रजिस्ट्रारला ती नोंदवण्याचे निर्देश दिल्यानंतर आता या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
Financial Allegations Vijay : रोख व्यवहारांवर प्रश्न
याचिकेनुसार, चित्रपट निर्मात्यांनी विजय यांना सुमारे 16 कोटी रुपये चेकद्वारे आणि जवळपास 4.93 कोटी रुपये रोख दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र कर केवळ चेकद्वारे दिलेल्या रकमेवरच भरल्याचा आरोप आहे. तसेच चौकशीदरम्यान विजय यांनी काही रोख रक्कम स्वीकारल्याचं मान्य केल्याचंही याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.
थलपथी विजय कर प्रकटीकरण: अतिरिक्त व्युत्पन्न घोषित
विजय यांनी 2015-16 या आर्थिक वर्षासाठी सुमारे 15 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न जाहीर केल्याची माहितीही समोर आली आहे. त्यानंतर त्यांनी पुढील वर्षासाठी एकूण उत्पन्नासह आयकर विवरणपत्र सादर केलं होतं. सध्या या सर्व घडामोडींमुळे विजय यांच्या विरोधात फौजदारी कारवाई आणि FIR दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून हायकोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
थलपथी विजय सरकार: सरकार स्थापनेचा दावा
दरम्यान, विजयच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेचा दावा केला आहे. विजयच्या टीव्हीके पक्षाला 108 जागा मिळाल्या आहेत. तर बहुमतासाठी 118 आमदारांची गरज आहे. विजयने राज्यपालांकडे 112 आमदारांचा पाठिंबा असलेलं पत्र दिलं आहे. काँग्रेसच्या पाच आमदारांनी विजय थलापतीला पाठिंबा जाहीर केला आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.