Yavatmal News – भरदिवसा शेतकऱ्याची दीड लाखांची रक्कम हिसकावली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरात दिवसाढवळ्या धक्कादायक प्रकार घडत शेतकऱ्याची दीड लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेली. सायखेडा येथील नामदेव शिंदे हे पीक कर्ज भरण्यासाठी आर्णीत आले होते.

बँक ऑफ इंडिया शाखेतून दीड लाख रुपये काढल्यानंतर ते सोसायटीकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी त्यांच्या हातातील पैशांची पिशवी झटक्यात हिसकावली आणि घटनास्थळावरून पसार झाले.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांकडे महत्त्वाचा पुरावा उपलब्ध झाला आहे.

दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला असून, दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments are closed.