भाजप नगरसेविकेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मनसे कार्यकर्त्याच्या खूनप्रकरणी अटकेत असलेल्या भाजपच्या नगरसेविका शालन शंकर शिंदे यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. राजवैद्य यांनी फेटाळला आहे.

महापालिका निवडणुकीदरम्यान मनसेचा कार्यकर्ता बाळासाहेब सरवदे याचा तलवारीने वार करत खून करण्यात आला होता. याप्रकरणी भाजपच्या नगरसेविका शालन शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, शिंदे यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. यात सरकारतर्फे ऍड. रजपूत, तर आरोपीच्या वतीने ऍड. न्हावकर काम पाहत आहेत.

Comments are closed.