Sushma Andhare Pune : अदिती तटकरेंनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केलं? म्हणाल्या, झेपत नसेल तर राजीनामा द्या; सुषमा अंधारेंनी सुनावलं

Sushma Andhare Pune : अदिती तटकरेंनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केलं? म्हणाल्या, झेपत नसेल तर राजीनामा द्या; सुषमा अंधारेंनी सुनावलं

गेल्या महीनाभर पुणे आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था पाहता हा प्रकार गंभीर आहे. महिला आणि मुलींच्या बाबतीत संवेदनशील राहण्याऐवजी फडणवीस सरकार राजकारण करत आहे. या सगळ्या प्रकरणात महिला बालकल्याण मंत्री कुठे आहेत? महिला बाल विकास आयोग कुठे आहे? महिला आयोग पद रिक्त असून आता का भरत नाही? सुनेत्रा पवार यांनी कोणालाही महिला आयोग अध्यक्ष करावं, लोकांनी कोणाकडे न्याय मागायला जायचे? असा संतप्त सवाल करत शिवसेना ठाकरे गटाच्या नेते सुषमा अंधारे यांनी सरकारवर टीका केली आहे.अदिती तटकरे यांनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केले, त्यांनी सांगावे. त्यांना व्यक्तिगत विरोध नाही, मात्र त्या पदावर आहेत, त्याबाबत अनेक प्रश्न ऐरणीवर येत असतील तर त्या प्रश्नाचे उत्तर शोधलं पाहजे. झेपत नसेल तर राजीनामा द्या. वडील पक्षाचे बादशहा आहेत म्हणून काम करणार का? असा खोचक टोलाही सुषमा अंधारे यांनी लागावला आहे.

Comments are closed.