Cycling Benefits: सायकलिंग, आनंद देणारा व्यायाम
लहान मुलं जेव्हा चालायलं लागतातं तेव्हा त्यांच्यासाठी आजही सगळ्यात आधी घरात जे गिफ्ट आणलं जात ते असतं सायकल. याच कारण म्हणजे सायकल चालवण्यासाठी हात आणि पायचं नाही तर संपूर्ण शरीर काम करतं. त्यामुळे सगळ शरीर नकळत व्यायामच करत असत. परिणामी शरीर मजबूत होतचं शिवाय सायकलिंग करताना व्यक्तीमध्ये जो आत्मविश्वास येतो तो त्याला अडचणीतून मार्ग काढणे शिकवतो. म्हणून आपल्याकडेच नाही तर जगभरात सर्वच वयोगटातील व्यक्तींमध्ये सायकलिंगचे क्रेझ कायम आहे. तसेच सायकलिंग हा कमी खर्चाचा, सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे.
सायकलिंगमुळे शरीर तंदुरुस्त राहते, हृदय मजबूत होते आणि मन प्रसन्न राहते. तसेच लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकजण सायकलिंग करू शकतो.
नियमित सायकल चालवल्याने वजन नियंत्रणात राहते, स्नायू बळकट आणि मजबत होतात. तसेच, हा पर्यावरणपूरक आणि आनंददायी व्यायामही आहे.त्यामुळे अनेकजण
सायकल चालवणे एन्जॉय करतात.
जर तुम्हीही सायकलिंगचा विचार करत असाल तर सुरुवातीला १५–२० मिनिटे सायकल चालवा.नंतर हळूहळू वेळ वाढवा
हेल्मेट वापरा.पाणी प्या. कारण सायकल चालवताना घाम येतो. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते.
सायकल चालवताना विशेषतः पायांचे, मांडीचे,कंबर, पोटाचे स्नायू मजबूत होतात. त्यामुळे स्नायूंची ताकद वाढते. शरीर अधिक फिट आणि सक्रिय राहते.
शरीराचा समतोल सुधारतो.
नियमित सायकलिंग केल्याने स्टॅमिना वाढतो. त्यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते. शरीराला अधिक ऑक्सिजन मिळतो
थकवा जाणवत नाही. परिणामी कार्यक्षमता वाढते. शरीराची सहनशक्ती वाढते.ऊर्जा वाढते
सायकलिंग केल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. सायकलिंगमुळे शरीराची हालचाल वाढते आणि सांधे सक्रिय राहतात.
हाडे आणि सांधे लवचिक राहतात. वृद्धापकाळात सांधे आखडण्याची समस्या कमी होते. शरीराची हालचाल सुधारते.
मात्र हाडे अधिक मजबूत करण्यासाठी सायकलिंगसोबत चालणे, सूर्यप्रकाश आणि कॅल्शियमयुक्त आहारही महत्त्वाचा आहे.
शिवाय सायकल चालवण्याचे मानसिक फायदेही आहेत. मानसिक आनंद मिळतो. त्यामुळे तणाव कमी होतो. मन प्रसन्न राहते.
झोप चांगली लागते.आत्मविश्वास वाढतो.
Comments are closed.