राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, संग्राम भंडारेंसह साथीदारांचे कृत्य

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर ह.भ.प संग्राम भंडारे आणि त्यांच्या 10 ते 15 गोरक्षक साथीदारांनी शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास शाईच्या बाटल्या ओतल्या. तसेच पिस्तुलाचा धाक दाखविला. या प्रकरणी संग्राम भंडारे, अक्षय कांचन यांच्यासह 14 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून वारकरी संप्रदायातील घुसखोरांचा मुद्दा लवांडे यांनी लावून धरला आहे. लवांडे आळंदी म्हातोबा येथे प्रवचनासाठी गेले होते. प्रवचन संपल्यानंतर ते परत येत असताना तीन गाडय़ांमधून आलेल्या संग्राम भंडारे आणि 10-15 गोरक्षकांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर शाई फेकली तसेच त्यांना धक्काबुक्की केली.

गृहमंत्र्यांनी गांभीर्याने नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत,’ अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या हल्ल्याचा निषेध केला.

Comments are closed.