बिहारमध्ये वीज पडून 9 जणांचा मृत्यू झाला

वृत्तसंस्था/ पाटणा

उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये शुक्रवारी सायंकाळनंतर जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. बिहारमधील पाटणासह सात जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी पाऊस झाला. झाडे कोसळून आणि वीज पडून नऊ जणांचा मृत्यू झाला. राजधानी पाटणामध्ये सर्वाधिक पाच जणांचा मृत्यू झाला. वादळात 600 हून अधिक झाडेही उन्मळून पडली. उत्तर प्रदेशातील आग्रा आणि जालौनमध्ये पाऊस झाला, तर मऊमध्ये गारपीटही झाली. येथील 17 जिह्यांमध्ये वादळी पाऊस, पाऊस आणि विजांचा इशारा देण्यात आला आहे. याचदरम्यान, मध्य भारतात तीव्र उष्णतेची लाट पसरू लागली आहे. राजस्थानमधील बारमेर हे देशातील सर्वाधिक उष्णतेची नोंद झाली असून तेथील तापमान 44.6 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. जैसलमेर आणि फलोदी येथेही तापमान 44 अंशांच्या वर तापमान नोंद झाले आहे.

Comments are closed.