विनेश फोगाटवर कुस्ती महासंघाची बंदी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाटवर आता हिंदुस्थानी कुस्ती महासंघाने बंदी घालत कडक कारवाई केली आहे. विनेशला राष्ट्रीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) कारणे दाखवा नोटीस बजावली असून 14 दिवसांच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. शिस्तभंग आणि डोपिंगविरोधी नियमांच्या कथित उल्लंघनाच्या आरोपांवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

‘डब्ल्यूएफआय’ने स्पष्ट केले आहे की, आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या (यूडब्ल्यूडब्ल्यू) डोपिंगविरोधी नियमांनुसार निवृत्तीनंतर पुनरागमन करणाऱया खेळाडूंसाठी सहा महिन्यांचा अनिवार्य नोटीस कालावधी लागू असतो. मात्र विनेशने हा कालावधी पूर्ण न केल्याने तिला जून 2026 पर्यंत देशांतर्गत स्पर्धांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

Comments are closed.