खरात प्रकरणात मंत्रिमंडळातील 4 मंत्र्यांचा समावेश, नाना पटोलेंचा दावा; निलंबनाची मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या खरात बाबावर आत्तापर्यत 10 गुन्ह्यांची नोंद झाली असून आता शिर्डीतील जमीन व्यवहारातील फसवणुकीच्या गुन्ह्यात भोंदू अशोक खरातला शनिवारी राहाता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे. खरात बाबाला अटक झाल्यापासून राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राज्य मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांचा थेट समावेश असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले यांनी खरात प्रकरणावर माध्यमांशी बोलताना महायुती सरकारवर हल्लाबोल केला. मी यापूर्वी विधानसभेतही या विषयावर भाष्य केलेलं आहे. खरातकडून सर्व माहिती काढून घेतली जात आहे. आणि जस एपस्टिना मारलं तसच खरातलाही मारतील. हीच वस्तुस्थिती आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

पुढे ते म्हणाले की, या खरात प्रकरणात फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील चार मंत्र्याचा समावेश आहे. याबाबत एक पत्र मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे पटोले यांनी सांगितले. या चारही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात यावे, अशा मागणी त्यांनी यावेळी केली.

खरात प्रकरणात कोणत्या बड्या नेत्यांची नावे आहेत, याबाबत अद्याप अधिकृत तपशील समोर आलेला नाही. मात्र नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

खरातचा ताबा पुन्हा नाशिक पोलिसांकडे

Comments are closed.