मुंबई हायच्या निर्जनुष्य प्लॅटफॉर्मवर ब्लॅक आऊट; बोटीचा अपघात टळला, उपाययोजना करण्याची मच्छीमारांची मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अरबी समुद्रातील मुंबई हाय परिसरात असलेल्या ओएनजीसी कंपनीच्या एका निर्जनुष्य प्लॅटफॉर्मजवळ सुदैवाने बोटीचा अपघात टळला आहे. या प्लॅटफॉर्मवर धोक्याची लाईट किंवा रेडियम मार्किंग नसल्यामुळे उत्तन येथील मच्छीमार नौका प्लॅटफॉर्मच्या अगदी जवळ पोहोचली, परंतु वेळीच पुढील धोका लक्षात येताच तांडेल यांनी बोट वळवल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे या ठिकाणी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी मच्छीमारांनी मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांकडे केली आहे.

भाईंदर पश्चिमेच्या उत्तन, डोंगरी, चौक येथील मासेमारी नौका ७ मे रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास समुद्रातून किनाऱ्याकडे परतत होती. त्यावेळी जीपीएस पोझिशन १९°४२.३५७’ N, ७२°५५.७६५’ E वर असलेल्या एका प्लॅटफॉर्मवर लाईट किंवा रेडियम मार्किंग नसल्यामुळे ही नौका प्लॅटफॉर्मच्या अगदी जवळ पोहोचली. बोट चालक तांडेल यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला. प्लॅटफॉर्मवर चेतावणी दिवे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी तो दिसून येत नाही, रेडियम मार्किंग किंवा रिफ्लेक्टर नसल्याने लाँगून अंदाज येत नसल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांना पत्र

प्लॅटफॉर्मवर लाईट नसल्यामुळे आमच्या नौकेचा मोठा अपघात थोडक्यात टळला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाने तत्काळ यावर कार्यवाही करणे आवश्यक आहे असे पाली-उत्तन मच्छीमार सहकारी सोसायटी लि.चे संस्थापक बर्नार्ड डिसमेलो यांनी सांगितले. मच्छीमार सोसायटीने ठाणे-पालघरचे मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त यांना याबाबत पत्र दिले आहे.

Comments are closed.