तामिळनाडूचे मुख्यमंत्री होताच थलपती विजय यांची राहुल गांधींसमोरच मोठी घोषणा; म्हणाले, ‘माझ्याशि

Thalapathy Vijay :  तामिळनाडूमध्ये चार दिवस चाललेल्या राजकीय उलथापालथी आणि सस्पेन्सनंतर अखेर ‘थलापती’ सी. जोसेफ विजय (Thalapathy Vijay) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ब्लॉकबस्टर चित्रपटासारख्या राजकीय हालचालीनंतर सत्तेवर पोहोचलेल्या विजय यांनी आपल्या पहिल्याच भाषणात बोलताना स्पष्ट केले की, तामिळनाडूमध्ये सत्तेचे केवळ एकच केंद्र असेल आणि ते म्हणजे ते स्वतः.(Thalapathy Vijay)

मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय म्हणाले, ‘माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही पॉवर सेंटर (सत्तेचे केंद्र) नसेल. सत्तेचा एकमेव केंद्रबिंदू मीच राहीन.’ त्यांच्या या विधानाचा आघाडीचे मित्रपक्ष आणि राजकीय विरोधक या दोघांसाठीही मोठा संदेश मानला जात आहे.

Thalapathy Vijay : ‘चुकीचे वागणाऱ्यांनी आपल्या योजना सोडून द्यावेत’

विजय यांनी आपल्या भाषणात स्वतःला ‘थम्बी’ म्हणजेच धाकटा भाऊ म्हणत असे सांगितले की, त्यांच्या सरकारवर कोणत्याही मित्रपक्षाचा दबाव चालणार नाही. त्यांनी विरोधकांनाही इशारा देण्याच्या स्वरात संदेश दिला. विजय म्हणाले, ‘मी स्वतः काही चुकीचे करणार नाही आणि माझ्यासोबत कोणाला चुकीचे करूही देणार नाही. जर कोणाच्या मनात चुकीच्या इच्छा असतील, तर त्यांनी ते तातडीने सोडून द्यावेत.'(Thalapathy Vijay)

Thalapathy Vijay : राहुल गांधींचा उल्लेख ‘माय ब्रदर’ असा केला

मुख्यमंत्री विजय यांनी सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देणाऱ्या सर्व पक्षांचे व्यासपीठावरून आभार मानले. त्यांनी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा उल्लेख आपला ‘भाऊ’ असा केला. विजय म्हणाले की, ते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ‘माझे भाऊ राहुल गांधी’, के.सी. वेणुगोपाल, सेल्वापेरुंथगई आणि प्रवीण चक्रवर्ती यांचे ऋणी आहेत. याशिवाय त्यांनी माकप नेते पी. शणमुगम आणि सु. व्यंकटेशन, व्हीसीके नेते थोल थिरुमावलवन, रविकुमार आणि वन्नियारासू, तसेच सीपीआय नेते एम. वीरापांडियन यांचेही आभार मानले. त्यांनी टीव्हीके कार्यकर्ते आणि ‘व्हर्च्युअल वॉरियर्स’चेही विशेष आभार मानले.

Thalapathy Vijay : ‘मी कोणी देवदूत नाही, सामान्य माणूस आहे’

आपल्या भाषणात विजय यांनी स्वतःला एक सामान्य माणूस म्हणत सांगितले की, ते कोणी देवदूत नाहीत. त्यांनी जनतेला थोडा वेळ देण्याचे आवाहन केले. विजय म्हणाले, ‘मी अशी आश्वासने देणार नाही जी मी पूर्ण करू शकणार नाही. पण आता मला खात्री आहे की तुमच्या सर्वांच्या सोबतीने आम्ही काहीही करू शकतो. मला थोडा वेळ द्या, मी हळूहळू आपली सर्व आश्वासने पूर्ण करेन. मी जनतेच्या एका पैशालाही हात लावणार नाही.’

Thalapathy Vijay :  विजय यांच्या मंत्रिमंडळात ९ नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

मुख्यमंत्री विजय यांच्यासोबत टीव्हीकेच्या इतर नऊ नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते के.ए. सेंगोट्टैयन हे सर्वात चर्चेत असलेले चेहरे ठरले, ज्यांनी एकेकाळी एमजीआर आणि जयललिता यांच्यासारख्या नेत्यांसोबत काम केले होते. याशिवाय विजय यांचे जवळचे रणनीतीकार मानले जाणारे आधव अर्जुन, टीव्ही आणि चित्रपट क्षेत्राशी संबंधित आणि आपल्या प्रभावी वक्तृत्व शैलीसाठी प्रसिद्ध असलेले राज मोहन, दंतवैद्य ते राजकारणी बनलेले डॉ. टी.के. प्रभू आणि मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री एस. कीर्तना यांनीही शपथ घेतली. काँग्रेस, सीपीआय(एम), व्हीसीके आणि आययूएमएलच्या ज्या नेत्यांनी टीव्हीके सरकारला पाठिंबा दिला आहे, ते खात्यांच्या वाटपावर चर्चा पूर्ण झाल्यानंतर नंतर मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.