केसगळती आणि टक्कल पडण्याची भीती वाटते? केसांच्या वाढीसाठी केळीची साल अशा प्रकारे वापरा, केस दाट होतील

सर्व महिलांना जाड आणि मजबूत केस हवे असतात. केसांच्या वाढीसाठी महिला सतत काही ना काही करत असतात. कधी केसांवर उपचार केले जातात तर कधी वेगवेगळे केस शॅम्पू, हेअर सीरम किंवा केसांची काळजी घेणारी उत्पादने वापरली जातात. परंतु चुकीच्या शाम्पू किंवा केसांची निगा राखणारी उत्पादने वारंवार वापरल्याने केस आणखी कोरडे आणि निस्तेज होऊ शकतात. केसांच्या मुळांना योग्य पोषण न मिळाल्याने केस गळण्याची शक्यता असते. त्यामुळे दाट केसांच्या वाढीसाठी नेहमी घरगुती उपाय करा. उन्हात जास्त वेळ बाहेर फिरल्यानंतर धूळ, प्रदूषण आणि सतत घामामुळे केस ओले होतात आणि केसांमध्ये कोंडा वाढतो.(छायाचित्र सौजन्य – istock)
उन्हामुळे तुमचा चेहरा जळला आहे का? मग बटाट्याचा रस 'अशा' पद्धतीने वापरा, त्वचेवरील जळजळ कमी होईल
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढता ताण, वाढत्या मानसिक ताणामुळे पोषक तत्वांचा अभाव याचा परिणाम शरीरावरच होत नाही तर त्वचेवर आणि केसांवरही होतो. त्यामुळे केसांची निगा राखण्यासाठी कोणतीही उत्पादने वापरण्याऐवजी केसांना कायमस्वरूपी स्वच्छ आणि चमकदार ठेवण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करावा. केळीची साल केसांसाठी खूप फायदेशीर असते. केळी खाल्ल्यानंतर त्याची साल फेकून दिली जाते. पण असे करण्याऐवजी केळ्याच्या सालीचा हेअर मास्क बनवून केसांना लावा. केळीच्या सालीमध्ये भरपूर पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक पोषक घटक असतात. हे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते आणि केसांना सुंदर बनवते.
केळीच्या सालीचे हेअर मास्क बनवण्याची कृती:
हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात केळीची ताजी साल कापून त्याची बारीक पेस्ट बनवा. तयार पेस्ट एका भांड्यात घ्या आणि त्यात खोबरेल तेल किंवा दही घालून चांगले मिसळा. तयार मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ते केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावा. त्यानंतर 40 मिनिटे केसांवर हेअर मास्क लावा आणि तसाच ठेवा. हेअर मास्क धुण्यापूर्वी हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्याने टाळू स्वच्छ होण्यास मदत होते.
समर स्पेशल : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी रेसिपी, नारळाच्या क्रीमने बनवा 'कोकोनट आईस्क्रीम'.
केळीच्या सालीमुळे कोंडा कमी होण्यास मदत होते. 40 मिनिटांनंतर, आपले केस पाण्याने स्वच्छ धुवा. केळीच्या सालीचा हेअर मास्क लावल्याने तुमचे केस खूप मऊ आणि गुळगुळीत होतील. याशिवाय केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. खोबरेल तेल किंवा दही वापरल्याने केसांची नैसर्गिक चमक राहते आणि केस मऊ होतात. केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी गरम पाण्याने केस कधीही धुवू नका. केस स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.
Comments are closed.