खरातसोबत केलेल्या पूजाविधी नेमक्या कोणत्या होत्या?,सातपुतेंचे धडाधड प्रश्न; चाकणकर म्हणाल्या…
Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची भोंदू अशोक खरात प्रकरणी (Ashok Kharat Case) काल तब्बल 6 तास एसआयटीकडून चौकशी झाली. एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी रुपाली चाकणकरांची खरात प्रकरणी चौकशी केली. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना पदाचा गैरवापर केल्याचा ठपका रुपाली चाकणकरांवर आहे. खरातसोबतचे संबंध आणि त्यानंतर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी झाली. एसआयटीच्या चौकशीत रुपाली चाकणकरांना तेजस्वी सातपुते यांनी धडाधड सवाल विचारले. (Rupali Chakankar SIT Inquiry)
एसआयटीने रुपाली चाकणकरांना कोणकोणते प्रश्न विचारले? (Rupali Chakankar SIT Inquiry)
- भोंदू अशोक खरातला केव्हापासून ओळखता?
- तुम्ही शिवनिका संस्थेवर असताना खरात प्रकरणाची माहिती होती का?
- अशोक खरातसोबत केलेल्या पूजाविधी नेमक्या कोणत्या होत्या?
- पूजाविधीमुळेच खरातसोबत आर्थिक संबंध जोडले गेले होते का?
- खरातसोबत काढलेले फोटो आणि व्हिडीओ नेमके केव्हाचे आणि कोणत्या कार्यक्रमातील आहेत?
- शिवनिका संस्थेच्या बैठकांमध्ये कोणतं कामकाज सुरु होतं?
- मंदिरात येणारे इतर राजकीय नेते कुणाच्या सांगण्यावरुन येत होते?
- खरात संबंधित आर्थिक व्यवहार कोणकोणत्या बँक खात्यांमधून झाले?
रुपाली चाकणकर एसआयटीच्या चौकशीत काय काय म्हणाल्या? (Rupali Chakankar SIT Inquiry)
माझे कुटुंब वारकरी संप्रदायाचे असून, मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला आध्यात्मिक श्रद्धेपोटी गुरू मानले होते, असं रुपाली चाकणकर एसआयटीसमोर म्हणाल्या. माझे आणि अशोक खरातचे आर्थिक संबंध नसून खरातकडे जाण्यासाठी मी कुणालाही आग्रह केला नाही, असं रुपाली चाकणकरांनी सांगितले. तसेच अशोक खरात याची दुसरी बाजू मला माहीत नव्हती, असा दावाही रुपाली चाकणकरांनी केला.
एसआयटीच्या चौकशीनंतर रुपाली चाकणकर काय म्हणाल्या? (Rupali Chakankar SIT Inquiry)
चौकशीत मी सगळ्या प्रश्नांची समर्पक उत्तर दिली आहेत. मला विश्वास वाटतो नक्कीच त्यांचं उत्तराने समाधान झालं असेल. पोलिसांना या तपासात जसं माझं सहकार्य हवं असेल ते पूर्णपणे मी सहकार्य करेन. काय प्रश्न विचारले हे अहवालातून तुम्हाला कळेल, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. पोलिसांना जे आवश्यक होतं त्यात मी सर्व सहकार्य केले. तपासात सविस्तर मी तपास यंत्रणासोबत बोलले. समर्पक उत्तर दिली आहे. चौकशी संदर्भात सविस्तर अहवाल तुमच्यापर्यंत येईल, असं नरेंद्र मोदींनी सांगितले.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.