लोकसभेची सदस्यसंख्या ८५० पर्यंत वाढवणे हा एक ‘जोक’; शशी थरूर यांचे विधान
संसदेत लोकसभेची सदस्यसंख्या ८५० पर्यंत वाढवणे हा एक ‘जोक’ असल्याचे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे. ‘अशा प्रकारच्या पावलामुळे सभागृहाचे रूपांतर चिनी ‘पीपल्स कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्स’च्या हिंदुस्थानी आवृत्तीत होईल’, असा युक्तिवाद देखील शशी थरूर यांनी केला आहे. शशी थरूर हे त्यांच्या विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा त्यांच्या विधानांनी वाद निर्माण केला आहे.
शशी थरूर यांच्या या युक्तिवादावर भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रविवारी कॅलिफोर्निया येथे ‘स्टॅनफोर्ड इंडिया कॉन्फरन्स २०२६’ मध्ये सहभागी होताना भाजप नेते तेजस्वी सूर्या यांनी असा युक्तिवाद केला की, निवडून आलेल्या प्रतिनिधींची जबाबदारी अधिक स्पष्ट करण्यासाठी मतदारसंघांची पुनर्रचना (delimitation) ही एक ‘लोकशाहीची गरज’ आहे आणि लोकसभेची सध्याची ५४३ ही सदस्यसंख्या तितकीच ठेवणे ‘हास्यास्पद’ आहे. ‘१९७१ ची लोकसंख्या २०२६ मधील १४० कोटी लोकांच्या लोकशाहीची गरज पूर्ण करू शकत नाही’, असे म्हणत लोकसभेचे खासदार सूर्या यांनी थरूर यांचे विधान खोडून काढण्याचा प्रयत्न केला.
Comments are closed.