हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलं, फोटोही हटवले; सोशल मीडियावर दावा, नेमकं सत्य का
हार्दिक पांड्या अनफॉलो मुंबई इंडियन्स न्यूज : आयपीएल 2026 मधून मुंबई इंडियन्सच्या बाहेर पडण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर मुंबईचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं आणि त्यानंतर संघात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या. विशेषतः हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्स फ्रेंचायझी यांच्यात तणाव निर्माण झाल्याच्या बातम्यांनी सोशल मीडियावर खळबळ उडवली. कारण, हार्दिकने मुंबई इंडियन्सशी संबंधित काही पोस्ट डिलीट केल्याचं आणि संघाला अनफॉलो केल्याचं समोर आलं होतं.
मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला केलं ड्रॉप
आयपीएल 2026 मध्ये हार्दिक पांड्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. कर्णधार म्हणून तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला, तर फलंदाजी आणि गोलंदाजीतही त्याचा प्रभाव दिसला नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेत हार्दिकला संघातून बाहेर बसवलं आणि नेतृत्वाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवली. शेवटच्या दोन सामन्यांत सूर्यकुमारने संघाचं नेतृत्व केलं, मात्र त्यानंतरही मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला.
हार्दिकने MI ला अनफॉलो केल्यामागचं सत्य काय?
हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सला अनफॉलो केल्याची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं. ट्रेड होणार, तो चेन्नई सुपर किंग्जमध्ये जाणार, काहींनी कोलकाता नाईट रायडर्सचं नाव घेतलं, तर काहींनी संघातील वरिष्ठ खेळाडूंशी त्याचे संबंध बिघडल्याचा दावा केला. मात्र प्रत्यक्षात वेगळीच माहिती समोर आली. हार्दिकने काही काळासाठी मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलं होतं आणि काही पोस्टही हटवल्या होत्या. पण नंतर त्याने पुन्हा संघाला फॉलो केलं. त्यामुळे सध्या तरी हार्दिक आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मोठा वाद असल्याचं स्पष्टपणे म्हणता येणार नाही.
हार्दिकची कामगिरी ठरली मोठी डोकेदुखी
आयपीएल 2026 मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची गाडी रुळावरच आली नाही. संघाने विजयापेक्षा पराभव जास्त पाहिले आणि अखेर स्पर्धेबाहेर पडावं लागलं. हार्दिकने या हंगामात 8 सामन्यांत केवळ 146 धावा केल्या, तर गोलंदाजीत फक्त 4 विकेट्स घेतल्या. त्याच्या फिक्या प्रदर्शनामुळे चाहत्यांमध्येही नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.