सुवेंदू अधिकारी ॲक्शन मोडमध्ये
बंगालमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल : ममता दीदींच्या निकटवर्तीयांची बदली
वृत्तसंस्था, कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये शुभेंदु अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने पोलीस आणि प्रशासकीय रचनेत मोठ्या स्तरावर फेरबदल करण्याचे संकेत दिले आहेत. याची झलक रविवारी दिसून आली आहे. मुख्यमंत्री अधिकारी यांनी शपथग्रहणाच्या 24 तासांच्या आत राज्य सचिवालयातील मुख्यमंत्री कार्यालयाच्या नोकरशाही संरचनेत व्यापक बदल केले आहेत. 16 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. स्थानांतरित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सर्वात प्रमुख नाव 2014 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी शांतनु मुखोपाध्याय यांचे असून ते ममता बॅनर्जी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात.
तृणमूल काँग्रेसशी संलग्न पश्चिम बंगाल सरकारी कर्मचारी संघाचे सर्वोच्च नेते आणि सचिवालयात नियुक्त प्रताप नायक यांची बदल दार्जिलिंग जिल्ह्यातील बिजनवारी येथील पालबाजार ब्लॉक विकास कार्यालयात करण्यात आली आहे. ममता बॅनर्जींच्या कार्यकाळात मुख्य सचिव म्हणून कार्यरत 46 अधिकाऱ्यांना अस्थायी स्वरुपात राज्य कार्मिक आणि प्रशासकीय सुधार विभागात नियुक्त करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री कार्यालय प्रशासनात बदल
शपथग्रहण सोहळ्याच्या काही तासातच सेवानिवृत्त आयएएस अधिकारी सुब्रत गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले. तर पश्चिम बंगालच्या 2017 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी सुब्रता बाला यांना मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव नियुक्त करण्याची घोषणा झाली आहे. कोलकाता पोलीस विभागातील 93 अधिकाऱ्यांची बदली शहराबाहेर करण्यात आली आहे. यातील बहुतांश अधिकारी हे तृणमूलशी संलग्न पोलीस कल्याण संघात प्रभावशाली होते.
Comments are closed.