आधी तुमच्या नेत्यांना सांगा सामान्य प्लेनने प्रवास करायला, मग जनतेला सल्ले द्या; अंजली दमानिया यांची पंतप्रधानांवर टीका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशातील जनतेला पेट्रोल, डिझेल आणि गॅस कमी वापरण्याचे आवाहन केले आहे. त्यासोबत त्यांनी जेवणात खाद्य तेल देखील कमी वापरण्यास सांगितल आहे. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सत्ताधाऱ्यावर जोरदार टीका केली आहे. दमानिया यांनी याबाबत ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्यातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक आवाहन केले आहे.

”प्रधानमंत्री पदाचा आदर म्हणून मी कधीही अशी तशी वक्तव्य करत नाही. कालचं मोदींचं भाषण ऐकलं. त्यांनी जनतेला सांगितलं की इंधन वाचवा, मेट्रोचा वापर करा. गाड्या वापरू नका, सोनं खरेदी करू नका. परदेश प्रवास टाळा, खाण्याचे तेल कमी वापरा. ते आणि त्यांचा पक्ष काय करतायत. याचा त्यांनी काहीच विचार करू नये. काल ते तीन ठिकाणी गेले. तेलंगणा, बंगळुरू, जामनगरला गेले. प्रत्येक ठिकाणी पब्लिक रॅली घेतल्या. ते स्वत: चार्टड प्लेनने जातात. तिथे गेल्यावर त्यांच्या चाळीस गाड्यांचा ताफा असतो. ते करणं कितपत योग्य आहे. शुक्रवारी ते पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. एक सामान्य स्त्री म्हणून मला हाच प्रश्न पडलाय की हे योग्य आहे का? जे तुम्ही बोलता ते करायला हवे. त्यांनी स्वत: वागवून दाखवावं. त्यांनी आपल्या नेत्यांना सांगावं चार्टड फ्लाईट जास्त वापरू नका, सामान्य फ्लाईटने जा. अगदी फार गरज असेल तेव्हा वापरा. असं नेत्यांना सांगितलं जात नाही पण जनतेला सर्व सल्ले दिले जातात” अशी टीका अंजली दमानिया यांनी केली आहे.

Comments are closed.