कोलंबियाच्या कोळसा खाणीत मोठा स्फोट – वाचा

मध्य दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया येथील कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात चार कामगारांचा मृत्यू झाला. याच भागात आठवडाभरापूर्वी अशीच घटना घडली होती, ज्यात नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. कुकुनुबा परिसरातील लास क्विंटास खाणीत अडकलेल्या चार खाण कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, असे कुंडिनामार्का प्रदेशाचे गव्हर्नर जॉर्ज एमिलियो रे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये सांगितले.

घटनेच्या वेळी कामगार 500 मीटर जमिनीखाली होते.

कुंडिनमार्का रिस्क मॅनेजमेंट ऑफिसने या घटनेबाबत सांगितले की, “ते आपत्कालीन परिस्थिती हाताळत आहेत.” यासह स्थानिक माध्यमांनी सांगितले की, घटनेच्या वेळी कामगार जमिनीच्या खाली सुमारे 500 मीटर (1,650 फूट) खोलवर होते. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी कोलंबियाच्या या भागात खाणीचे अपघात नेहमीचे आहेत.

स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, हे अपघात बेकायदेशीर किंवा लहान खाणींमध्ये खराब वायुवीजनामुळे होतात जे परवानग्याशिवाय चालतात आणि सुरक्षा मानकांची पूर्तता करत नाहीत. याआधी 4 मे रोजी कुंडीनमार्का येथील सुटाटुसा नगरपालिकेतील आणखी एका भूमिगत कोळसा खाणीत स्फोट झाला होता. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून सहा जणांना वाचवण्यात यश आले आहे.

Comments are closed.