मध्य प्रदेशातून ISI संशयितांना अटक
दिल्ली पोलिसांकडून तीन तरुणांवर कारवाई
वृत्तसंस्था/ भोपाळ
दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’शी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या मध्य प्रदेशातील तीन तरुणांना अटक केली आहे. या कारवाईच्या माध्यमातून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तानी गुप्तचर संस्थेशी संबंधित एका मोठ्या दहशतवादी गटाचा पर्दाफाश केला आहे. अटक करण्यात आलेले सदर तरुण दिल्लीतील एक ऐतिहासिक मंदिर, दिल्ली-सोनीपत महामार्गावरील एक ढाबा आणि हरियाणातील एक लष्करी छावणी उडवून देण्याची योजना आखत होते, असे तपासात स्पष्ट झाले आहे. हे आरोपी पाकिस्तानी सूत्रधारांच्या सांगण्यावरून दिल्ली-एनसीआरमधील मंदिरे, ढाबे आणि लष्करी छावण्यांना लक्ष्य करण्याचा कट रचत होते. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे.
Comments are closed.