इन्स्टाग्रामवर प्रेम जडलं, बांगलादेशी तरुणी थेट जळगावात पोहोचली; विनापासपोर्ट भारतात प्रवेशाचा
जळगाव क्राईम न्यूज : सोशल मीडियावरील (Social Media) प्रेमासाठी सीमा ओलांडून भारतात (India) येण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. अशीच एक खळबळजनक घटना जळगाव (Jalgaon) शहरात समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) झालेल्या ओळखीनंतर प्रेमात पडलेली एक 20 वर्षीय बांगलादेशी (Bangladesh) तरुणी चक्क बेकायदेशीररीत्या सीमा ओलांडून जळगावात दाखल झाली. मात्र, जळगावच्या शनिपेठ पोलिसांनी (Police) या तरुणीचा शोध घेत तिला अटक केली असून, तिला आश्रय देणाऱ्या युवकावरही गुन्हा दाखल केला आहे.
Jalgaon Crime News: गुप्त माहितीवरून पोलिसांची कारवाई
जळगाव शहरातील भोई गल्ली, जोशी पेठ परिसरात एक परदेशी महिला कोणतीही परवानगी नसताना राहत असल्याची गुप्त माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयास्पद ठिकाणी छापा टाकला असता, कोणीका राणी शामलचंद्र राय (वय 20) ही बांगलादेशी तरुणी आढळून आली. तपासादरम्यान तिच्याकडे कोणतेही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याचे स्पष्ट झाले.
Jalgaon Crime News: इन्स्टाग्रामवर प्रेम जडलं
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. जळगावमधील सोने कारागीर चिन्मय जगन्नाथ वाला आणि कोणीका राणी यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले. चिन्मयच्या प्रेमाखातर आणि त्याच्याशी लग्न करण्यासाठी कोणीका हिने कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेविना बांगलादेशची सीमा ओलांडली आणि भारतात प्रवेश केला.
Jalgaon Crime News: लग्नाचा दावा, पण पुरावा नाही
पोलिसांनी कारवाई केली तेव्हा कोणीका आणि चिन्मय या दोघांनीही आम्ही लग्न केले असल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्याकडे विवाहाचा कोणताही कायदेशीर पुरावा किंवा अधिकृत कागदपत्रे आढळून आलेली नाहीत. विनापरवाना वास्तव्यास असल्याने पोलिसांनी कोणीका राणीला अटक केली असून चिन्मय वाला याच्यावरही आश्रय दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Jalgaon Crime News: कडक कायदेशीर कारवाई
या प्रकरणी शनिपेठ पोलिसांनी इमिग्रेशन कायदा आणि परदेशी नागरिक कायदा 2025 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, ही तरुणी सीमा ओलांडून भारतात नेमकी कशी पोहोचली आणि तिला वाटेत कोणी मदत केली का? याचा शोध घेतला जात आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.