शेवटच्या चेंडूवर RCB जिंकली… तरीही पाटीदार भडकला! म्हणाला, आम्ही हा सामना जिंकण्याच्या लायकीच
Rajat Patidar RCB vs MI IPL 2026 : रजत पाटीदारने मुंबईविरुद्धच्या थरारक विजयानंतर मोठं वक्तव्य करत आपल्या संघालाच आरसा दाखवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेरच्या चेंडूवर सामना जिंकला असला, तरी “हा सामना जिंकण्यास आम्ही पात्र नव्हतो,” अशी प्रामाणिक कबुली त्याने दिली. मुंबईने प्रथम फलंदाजी करत 166 धावांचं आव्हान उभं केलं होतं. प्रत्युत्तरात आरसीबीची सुरुवातच खराबच झाली. विराट कोहली गोल्डन डकवर बाद झाला, तर अवघ्या २७ धावांत संघाने ३ विकेट्स गमावल्या. अशा बिकट परिस्थितीत कृणाल पांड्या संकटमोचक बनला. त्याने 73 धावांची तुफानी खेळी करत आरसीबीला पुन्हा सामन्यात आणलं आणि विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवलं. अखेरच्या षटकात आरसीबीला 15 धावांची गरज होती. मात्र राज बावाला त्या धावा रोखता आल्या नाहीत आणि शेवटच्या चेंडूवर बंगळुरूने सामना खिशात घातला.
सामन्यानंतर पाटीदार म्हणाला, “आता सगळं नॉर्मल वाटतंय, पण हा खूप टाईट सामना होता. एकूणच भन्नाट गेम झाला. विशेषतः केपी म्हणजेच क्रुणाल पंड्याने संघासाठी जे केलं, ते अप्रतिम होतं.” क्रुणालला पाचव्या क्रमांकावर पाठवण्याबाबत तो म्हणाला, “हा पूर्ण टीमचा निर्णय होता. टीम मिटिंगमध्ये आम्ही याबद्दल चर्चा केली होती. त्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि मोठ्या स्टेजवर, दबावाच्या क्षणी असे खेळाडूच संघाला सावरतात.”
भुवनेश्वर कुमारबद्दल बोलताना पाटीदार त्याच्या गोलंदाजीवर अक्षरशः फिदा झाला. “त्याचं बॉलवरचं कंट्रोल अविश्वसनीय आहे. दोन गती आणि अनियमित बाऊन्स असलेल्या विकेटवर त्याला खेळणं खूप कठीण होतं, आम्ही सध्या पॉइंट्स टेबलकडे पाहत नाही. आमचा फोकस फक्त आपल्या ताकदीवर आणि चांगलं क्रिकेट खेळण्यावर आहे, असं तो म्हणाला.
आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो….
मात्र सर्वाधिक चर्चेत राहिलं ते त्याचं प्रामाणिक विधान. पाटीदार म्हणाला, “आमच्या गोलंदाजांनी जबरदस्त काम केलं आणि मुंबईला 166 धावांवर रोखलं. हा स्कोअर सहज चेस होऊ शकत होता. पण खरं सांगायचं तर, आमच्या बॅटिंग लाइनअपनुसार आम्ही हा सामना अधिक सहज जिंकायला हवा होता. त्यामुळे मला वाटतं, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो.”
आरसीबीच्या थ्रिलर विजयानंतर रजत पाटीदार यांचे प्रामाणिक शब्द 👀
– “प्रामाणिकपणे सांगायचे तर, मला वाटते की आम्ही हा सामना जिंकण्याच्या लायकीचे नव्हतो. आमच्या फलंदाजीसाठी 166 धावांचा पाठलाग करणे सहज शक्य होते. परिस्थिती किंवा खेळपट्टी काहीही असो, आम्ही त्या लक्ष्यांचा सहज पाठलाग करण्यास सक्षम आहोत.” 💪 #RCBvMI pic.twitter.com/VGnWTpLeKw— योगेश गोस्वामी (@yogeshgoswami_) 11 मे 2026
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.