Ratnagiri News – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जोडरस्ते चिखलमय; शिंदे आंबेरीतील ग्रामस्थ संतप्त
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली ते बावनदी दरम्यानची कामे रखडले असून प्रामुख्याने दोन रस्त्यांचे डांबरीकरण न केल्याने तसेच ते गावांशी व्यवस्थित न जोडल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार विरुद्ध जन आंदोलन करण्याचा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.
संध्याकाळच्या दरम्यान मुसळधार पावासामुळे गावांशी जोडणारे रस्त्ये चिखलमय झाले आहेत. शिंदे आंबेरी येथील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कुलकर्णी याना ग्रामस्थांनी भेटून जोडरस्ता तयार करण्याचे सांगितले होते. तसेच महामार्ग ठेकेदार कंपनीला याबाबत सांगूनही जोड रस्ता व्यवस्थित केलेला नाही. याबाबत येथील ग्रामस्थ मारुती शिंदे, बाबु बने, प्रथमेश शिंदे, राकेश खसासे, संतोष आलीम,बाबु रावुत यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
पहिल्याच अवकाळी पावसात चिखल झाला असून दुचाकी तसेच पादचारी यांना चालणेही कठीण झाले आहे. तसेच माभळे या ठिकाणी हीच अवस्था असून महामार्गवर वाहने चालविणेही कठीण होत असून वाहतूक कोंडीने ग्रामस्थ आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
Comments are closed.