पाण्यासाठी महिलेची वीरुगिरी, एक महिला चढली टॉवरवर; बेलगावमध्ये पाणीटंचाईवरून संताप, महिलांचे आंदोलन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा तालुक्यातील बेलगाव गावात पाण्यासाठी लोकांच्या संतापाचा उद्रेक झालाय. महिलांनी आंदोलन करतानाच भर उन्हात एक महिला चक्क टॉवरवर चढली. यामुळे पाणीटंचाईची तीव्रता पुढे आली. गेल्या अनेक दिवसांपासून बेलगावात तीव्र पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने महिलांचा संताप उफाळून आला. महिलांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत त्यांना घेराव घातला.

आंदोलन अधिक तीव्र करत एका महिलेने तहसील कार्यालयाच्या मागील टॉवरवर चढून निषेध व्यक्त केला. लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय खाली उतरणार नसल्याची ठाम भूमिका तिने घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, ग्रामस्थांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Comments are closed.