नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर देशभरात खळबळ; 1 कोटी लोकांचा रोजगार धोक्यात, जीसेसीचा दावा
नरेंद्र मोदी सोन्याच्या पेट्रोल डिझेलवर पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं (Gold) खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा (Petrol Diesel) वापरही कमीत कमी करावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलं. तसंच शाळांनीही ऑनलाईन वर्ग सुरु करावेत असंही नरेंद्र मोदी म्हणाले. सलग दोन दिवस नरेंद्र मोदींनी देशवासियांना आवाहन केल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत. परकीय चलनाला मिळणारी चालना थांबवण्यासाठी पंतप्रधानांनी हे आवाहन केलं. हैदराबादपाठोपाठ गुजरातमध्येही मोदींनी हे आवाहन केलं. नरेंद्र मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर देशात खळबळ उडाली आहे. ज्वेलरी असोसिएशनचे पदाधिकारी आज घेणार पीएमओतील अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. 1 कोटींहून अधिक लोकांच्या रोजगारावर परिणामाची भीतीही जीसेजीकडून यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. (Narendra Modi On Gold Petrol Diesel)
नरेंद्र मोदींनी नागरिकांना पुढील एक वर्षासाठी लग्नसमारंभासाठी सोन्याची खरेदी थांबवण्याचे आवाहन केल्यानंतर दागिने उद्योजकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सराफांना भीती आहे की या आवाहनामुळे सोन्याच्या मागणीत मोठी घट होऊ शकते, ज्यामुळे रोजगार आणि व्यवसाय या दोन्हींवर परिणाम होईल. मोदींच्या विधानानंतर ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (GJC) ने या आवाहनावर चिंता व्यक्त केली. जर सोने खरेदी पूर्णपणे ठप्प झाली, तर 1 कोटींहून अधिक लोकांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो, असा दावा जीजेसीने केला आहे. देशातील ज्वेलरी उद्योगाची वार्षिक उलाढाल जवळपास 10 लाख कोटी रुपये आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर या उलाढालीत थेट 30 टक्के म्हणजेच सुमारे 3 लाख कोटी रुपयांची घट होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. (Narendra Modi On Gold Petrol Diesel)
होर्मुझमधील सामुद्रधुनीवरील तणाव कायम- (होर्मुझची सामुद्रधुनी)
मध्य पूर्वेत इराण आणि अमेरिकेमध्ये सध्या युद्धविराम असला तरीही होर्मुझमधील सामुद्रधुनीवरील तणाव कायम आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सुमारे 3.30 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. यामुळे कच्च्या तेलाचा दर 104 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेला आहे. तसंच अमेरिकेतही कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ दिसून आली असून तिथे जवळपास 3 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे अमेरिकेत कच्च्या तेलाचा दर 98 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे पोहोचला आहे.
नरेंद्र मोदींच्या आवाहनामागील मोठी कारणं- (why pm modi appeal for work from home and not to buy gold)
एकंदरीत पाहता, या सर्व घटकांमुळे सरकारवर आपला डॉलर साठा जपून ठेवण्याचा दबाव वाढला आहे. याचे कारण असे की, जेव्हा जेव्हा भारत वस्तूंची आयात करतो, उदा. तेल, वायू (गॅस), सोने किंवा खते तेव्हा त्याचे पेमेंट (पैसे) डॉलरमध्ये केले जाते. परिणामी, जेव्हा वस्तूंच्या किमती वाढतात, तेव्हा अधिक प्रमाणात डॉलर खर्च करावे लागतात. यामुळे परकीय चलन साठ्यावर ताण येतो आणि रुपयाची स्थिती कमकुवत होते. नेमक्या याच कारणामुळे सरकार जनतेला अनावश्यक खर्च कमी करण्याचे आवाहन करत आहे. जसे की सोन्याची खरेदी करणे, इंधनाचा अतिवापर करणे किंवा परदेश प्रवास करणे. अशा उपाययोजनांमुळे डॉलरची बचत होईल आणि अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्यास मदत मिळेल. पंतप्रधानांचे हे आवाहन एक ‘सावधगिरीचा उपाय’ म्हणून पाहिले जात आहे; जागतिक संकटाच्या काळात भारताच्या आर्थिक स्थितीचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यात येऊ शकणाऱ्या मोठ्या आर्थिक धक्क्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
नरेंद्र मोदींनी देशाला कोणती आवाहनं केली? (Narendra Modi On Gold Petrol Diesel)
- सोन्याची खरेदी टाळा
- पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा
- वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या
- परदेश प्रवास टाळा
- खाद्यतेलाचा वापर कमी करा
- नैसर्गिक शेतीचा अवलंब करा
- स्वदेशी उत्पादनं वापरा
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.