Nanded News – कौटुंबिक वादातून पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या
हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथे कौटुंबिक वादातून एका पतीने आपल्या पत्नीचा काल रात्री खुन करुन आज सकाळी झाडाला गळफास घेऊन पतीनेही आत्महत्या केली आहे. याबाबत पोलिसांनी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल केला नाही.
हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथे माहेरी आलेल्या पत्नीला भेटण्यासाठी विनोद रंगराव राठोड हे सासरी आली होते. मात्र त्यांच्यात काल रात्री वाद झाला. आणि विनोद राठोड याने आपली पत्नी पायल राठोड हिचा धारदार शस्त्राने रागाच्या भरात खुन केला. ती जागेवरच मृत पावली. या घटनेनंतर तो फरार झाला. मात्र आज दुसर्या दिवशी त्याचे प्रेत धानोरा शिवारात सापडले. धानोरा शिवारात त्याने एका झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. सहायक पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी या दोन्ही घटनेचा पंचनामा करुन प्रेत उतरीय तपासणीसाठी पाठविले आहे. अद्यापपर्यंत या प्रकरणात कुठलाही गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी सांगितले.
Comments are closed.