हरभरा खरेदी पोर्टल अचानक बंद; केंद्राबाहेर शेतकरी प्रतीक्षेत, दुहेरी वाहतूक खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्यात हरभरा खरेदीचे शासकीय पोर्टल ८ मे रोजी अचानक बंद झाल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. खरेदी केंद्रांवर माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना मोजणी न होताच ट्रॅक्टर व पिकअपसह माघारी परतावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी हरभरा खरेदीची मर्यादा निश्चित केली असली, तरी प्रत्यक्षात पोर्टल बंद पडल्याने संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाली आहे. कडक उन्हात हजारो रुपये खर्च करून माल केंद्रावर आणलेल्या शेतकऱ्यांवर आता दुहेरी वाहतूक खर्चाचा भुर्दंड पडत आहे.

भारतीय किसान संघाने केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे अतिरिक्त खरेदी कोटा मंजूर करून पोर्टल तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. शासकीय खरेदी बंद राहिल्यास व्यापारी कमी दरात माल खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करतील, अशी भीती संघटनेने व्यक्त केली आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा हरभरा हमीभावाने खरेदी करावा व खरेदी केंद्रांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही होत आहे.

Comments are closed.