अल्पवयीन गर्लफ्रेंडने स्वत:चेच नको नको ते व्हिडीओ व्हायरल केले, बॉयफ्रेंडने फोन न उचलल्याने संत

कोल्हापूर क्राईम न्यूज: कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील एक धक्कादायक घटना (Kolhapur Crime News) समोर आली आहे. प्रियकर फोन उचलत नसल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीने स्वतःचे प्रियकरासोबतचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केले. सदर घटनेनंतर कोल्हापूर हादरलं आहे.

प्रियकर टाळाटाळ करत असल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीने व्हिडीओ व्हायरल करण्याचे टोकाचे पाऊल उचललेले. सदर मुलीने प्रियकरासोबत असलेले तीन अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल टाकले. या घटनेनंतर संबंधित तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून शिरोळ पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. तसेच व्हिडीओ चित्रित करण्यात आलेल्या लॉजच्या मालकाची देखील चौकशी करण्यात येणार आहे. (Kolhapur Crime News)

पुण्यातही धक्कादायक घटना- (Pune Crime News)

पुण्यात आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराने खून केल्याची घटना काळेपडळ येथे घडली आहे.  याप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगारासह सहा जणांना अटक केली आहे. प्रेमसंबंध तोडण्यासाठी तरुणीच्या आईच्या प्रियकराने टाकलेला दबाव आणि त्याने दिलेल्या धमकीमुळे त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील काळेपडळ परिसरात घडली. खून केल्याप्रकरणी तरुणीच्या प्रियकरासह साथीदारांना काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला प्रियकर हा सराईत गुन्हेगार आहे.

बेळगावमध्ये हाँटेलमधील महिला कर्मचाऱ्याचे अंघोळ करतानाचे फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी- (Belgaon Crime News)

बेळगावमधील शेगाव शहरातील एका प्रसिद्ध हॉटेल मध्ये कर्मचारी म्हणून कामाला असलेल्या महिलेचे अंघोळ करतानाचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत हॉटेल मालकानेच कर्मचारी महिलेच लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने शेगाव शहरात खळबळ उडाली आहे. शेगाव शहरातील खामगाव मार्गावरील एका प्रसिद्ध हॉटेल मध्ये अनेक महिला कर्मचारी कामावर आहेत. हॉटेल मधील एका महिला कर्मचाऱ्याचे या हॉटेल मालकाने चोरून अंघोळ करतानाचे फोटो व व्हिडीओ काढले व ते व्हायरल करण्याची धमकी पीडित महिलेला देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला शिवाय जातीवाचक शिव्याही दिल्या. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारी वरून शेगाव पोलिसांनी तात्काळ   हॉटेल मालक ज्ञानेश्वर लिप्ते याच्या विरुद्ध लैंगिक अत्याचार, विनयभंग व ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे शेगाव शहरात खळबळ उडाली असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

संबंधित बातमी:

Pune Crime News: कंडोम, कॅटबरी अन् झंडूबाम चोरट्यांचा डल्ला; पुण्यातील चाकणच्या मेडिकल दुकानात अजब चोरी, CCTV मध्ये सगळं दिसलं!

Pune Crime News: संबंध तोडण्यासाठी दबाव अन् धमकी…; मुलीच्या प्रियकराने आईच्या बॉयफ्रेंडला भररस्त्यात संपवलं, पुण्यातील थरारक घटना

आणखी वाचा

Comments are closed.