बनावट कागदपत्रांद्वारे व्हीआयपी सिमकार्ड विक्री, एकाचा नंबर दुसऱ्याला विकून लाखोंची कमाई
व्होडाफोन सिमकार्डच्या गॅलरीमध्ये पद्धतशीर सेटिंग लावायची. मग तेथून विकलेले व्हीआयपी नंबरची माहिती मिळवायची. संबंधितांच्या नावाने बनावट कागदपत्र बनवून ते व्हीआयपी नंबरचे सिमकार्ड 30 ते 40 लाखांत इतरांना विकून झोल करणाऱया भामटय़ाच्या डी.बी. मार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
दक्ष अग्रवाल (37) असे त्याचे नाव आहे. ग्रॅण्ट रोड परिसरातील एका व्यावसायिकाचा व्हीआयपी नंबर अचानक बंद झाला. त्यामुळे त्यांनी नवजीवन कॉर्नर येथील व्होडाफोन गॅलरीमध्ये चौकशी केली असता त्यांचा नमूद व्हीआयपी क्रमांक हा त्यांच्या संमतीशिवाय दीपेश तिवारी व त्याच्या साथीदाराने फिर्यादी यांच्या कंपनीचे बनावट लेटरहेड व स्वाक्षरी बनवून ते गॅलरीत दिले. मग त्याद्वारे गॅलरीतील काहींना हाताशी धरून तो व्हीआयपी नंबर तब्बल 35 लाखांत दीपेश तिवारी याला विकल्याचे निष्पन्न झाले. हा बोगस कारभार समोर येताच व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीवरून डी.बी. मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
चॅलेंज देत पोलिसांचा इगो दुखावला
दक्ष याचा माग काढणे सोपे नव्हते; कारण तो नियमित सिम कार्ड व राहण्याचे ठिकाण बदलत होता. दोन वेळा बंगळुरूवरून पोलिसांना चकवा देत निसटण्यामध्ये तो यशस्वी ठरला. मग त्याने पोलिसांना चॅलेंज दिले. माझे 24 तासांचे लाईव्ह लोकेशन देतो, पकडून दाखवा. हे चॅलेंज स्वीकारत सपोनि डिगे व पथकाने आपले काwशल्य पणाला लावत दक्ष हा अहमदाबाद येथे असल्याचे शोधून काढले. मग तेथे जाऊन त्याला पकडण्यात आले.
शेकडो व्हीआयपी सिम कार्डचा झोल
दक्ष याने व्होडाफोन गॅलरीत सेटिंग लावून शेकडो व्हीआयपी नंबर बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवून एक सिम 30 ते 40 लाखांत विकल्याचे समोर येत आहे. घटस्पह्टीत असलेल्या दक्षच्या देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये मैत्रिणी आहेत. त्यांच्याशी फसवणूक करून मिळवलेला पैसा असल्याचे समोर येत आहे.
Comments are closed.