आई अन् भावांनीच रचला बहिणीविरुद्ध कट; वडिलांच्या मृत्यूनंतर खोटी सही, कोट्यवधींची मालमत्ता हडपल

अंबरनाथ : अंबरनाथमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कोट्यवधींच्या मालमत्तेवर डल्ला मारण्यासाठी सख्ख्या आई आणि दोन भावांनी मिळून आपल्याच बहिणीची (Thane Crime News) फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंबरनाथमधील भाजपचे दिवंगत नेते गुलाबराव करंजुले यांचे मोठे बंधू आनंदराव करंजुले यांच्या निधनानंतर, त्यांच्या मुलांनी वडिलांच्या खोट्या सह्या करून बनावट मृत्यूपत्र (Thane Crime News) तयार केले. धक्कादायक म्हणजे, ज्या तारखेचा स्टॅम्प पेपर वापरला, त्या तारखेला वडिलांचे निधन होऊन दोन वर्ष उलटली होती. अखेर पीडित बहिणीने माहिती अधिकारात ही पोलखोल केल्यानंतर या प्रकरणी पोलीस ठाण्यात आई, दोन भाऊ आणि दोन साक्षीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Thane Crime News)

Thane Crime News: नेमकं प्रकरण काय?

अंबरनाथ मधील अर्चना आनंदराव करंजुले यांनी आपल्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. अर्चना यांचे वडील आनंदराव करंजुले यांचे ६ जुलै २०२३ रोजी निधन झाले होते. वडिलांच्या नावे अंबरनाथ आणि अहमदनगरमध्ये कोट्यवधींची मालमत्ता, दुकाने आणि घरे आहेत. या मालमत्तेचा वारसदार घ्यावा यासाठी बँकेकडून अनेक वेळा पत्र येत होते, यामुळे या मालमत्तेतून येणारे बँकांचे भाडे मिळावे यासाठी अर्चना या आपल्या भावांकडे (प्रशांत आणि संतोष करंजुले) वारस दाखल्यासाठी पाठपुरावा करत होत्या. मात्र या दरम्यान दोन्ही भावाने तिच्याशी बोलणं बंद करून त्यांच्या आईने आणि भावांनी त्यांना कोणतीही कल्पना न देता न्यायालयात वारस दाखल्यासाठी अर्ज केला इतकेच नाही, तर वडिलांनी १२ ऑक्टोबर २०२२ रोजी एक मृत्यूपत्र बनवल्याचा दावा करत टाईम पेपर देखील न्यायालयात दाखल केले, ज्यामध्ये अर्चना यांना मालमत्तेतून तिला पूर्णपणे बेदखल करण्यात आले होते.

मात्र, त्या मृत्यूपत्रावरील सही वडिलांची नसल्याचा संशय अर्चना यांना आला आणि अर्चना यांनी हार न मानता माहिती अधिकारांतर्गत  मुद्रांक कार्यालयातून त्या स्टॅम्प पेपरची माहिती काढली. तेव्हा समोर आलेल्या माहितीने पोलीसही चक्रावून गेले. जो स्टॅम्प पेपर १२ ऑक्टोबर २०२२ रोजीचा असल्याचे दाखवण्यात आले होते, तो प्रत्यक्षात १६ ऑक्टोबर २०२३ रोजी वितरीत करण्यात आला होता. म्हणजेच, वडिलांच्या निधनानंतर ३ महिन्यांनी तो स्टॅम्प पेपर चलनात आला होता. मृत व्यक्तीने आपल्या मृत्यूनंतर एक वर्षाने स्टॅम्प पेपरवर सही कशी केली? या एका प्रश्नाने संपूर्ण बनाव उघड पाडला आणि त्या तिघांविरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी अडचणाने पोलीस स्टेशन गाठले मात्र अंबरनाथमधील राजकीय प्रभावामुळे पोलीस त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ करत होते.

“आरोपी आमचे मित्र आहेत,” असे उत्तर त्यांना पोलिसांकडून मिळत होते. अखेर त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. यानंतर कल्याण झोन तीनचे पोलीस उपआयुक्त (DCP) अतुल झेंडे यांच्या आदेशानुसार या प्रकरणाची शहानिशा करण्यात आली आणि अखेर कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.​सध्या या प्रकरणात आई सुनंदा करंजुले, भाऊ प्रशांत आणि संतोष करंजुले, तसेच साक्षीदार अमित जैन आणि प्रदीप सिंग यांच्यावर फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.