मतीन पटेलांना मोठा दणका; जिकडे निदा खानला लपवलं, ‘त्या’ घरावर चालला पालिकेचा बुलडोझर; घरही जमीन
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये एआयएमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांचे घर आणि कार्यालय आज (बुधवारी) सकाळी बुलडोझरने पाडण्यात आले. ही कारवाई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणात केली आहे. नाशिकमधील टीसीएस कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतर (chhatrapati sambhajinagar) प्रकरणातील आरोपी निदा खानला 7 मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली होती. मतीन पटेलने तिला आपल्या घरात आश्रय दिला होता. यानंतर 9 मे रोजी महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावली होती आणि 72 तासांत उत्तर मागितले होते.(chhatrapati sambhajinagar) आज मतिन खानच्या त्या घरावर देखील बुलडोजर चालवण्यात आलं.
Nida Khan Home Demolition : निदा खानला वेळोवेळी मदत केल्याचा आरोप
निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना पोलिसांपासून वाचवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरक्षित स्थळ मिळवून देण्यात मतीन पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. केवळ राहण्याची सोयच नाही, तर तपासाची दिशा भरकटवण्यासाठी आणि पोलिसांपासून लपून राहण्यासाठी पटेल यांनी निदा खानला वेळोवेळी मदत केल्याचाआरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांना सहआरोपी देखील करण्यात आलं आहे, त्यानंतर आता महापालिकेने त्यांच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा फिरवून मोठा दणका दिला आहे.
Nida Khan Home Demolition : फुलांची उधळण अन् पोलिसांचा कडा पहारा
आज सकाळी ६ वाजता महापालिकेचे पथक बुलडोझरसह घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे, प्रशासनाच्या या भूमिकेचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून, कारवाई दरम्यान काही लोकांनी महापालिका आयुक्तांवर फुलांची उधळण केली. निदा खान ज्या घरात ७ दिवस राहिली होती, त्या घरावरही लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
नाशिक मधील टीसीएस (TCS) धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला लपण्यासाठी मदत करणे एमआयएमचे माजी नगरसेवक मतीन पटेल यांना चांगलंच भोवलं आहे. गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांविरोधात प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आणि मतीन पटेल (Matin Patel) यांच्या निवासस्थानावर महापालिकेने बुलडोझर चालवला.
Nida Khan Home Demolition : स्वतःचे घर पूर्ण रिकामं केलं, संविधान देऊन, फुलं टाकून स्वागत
आज सकाळीच मतीन पटेल यांनी स्वतःहूनच घर पडायला सुरुवात केली. निदा खान लपवल्याप्रकरणी महापालिकेने अवैध असलेल्या मतीन पटेल च्या घरावर बुलडोझर चालवण्याची तयारी केली. त्या आधीच मतीन पटेलच्या वतीने स्वतःचे घर पूर्ण रिकामं केलं, सामान काढलं आहे. मतीनच्या घरच्या लोकांनी मनपा पथक अधिकारी कर्मचारी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कारवाईसाठी आले असताना संविधान देऊन आणि फुलं टाकून स्वागत केलं. या कारवाईवेळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता,
1 डीसीपी, 2 एसीपी, ११ पीआय, 15 पीएसआय एपीआय, 8 महिला पोलीस अधीकारी, 120 पुरुष कर्मचारी, 60 महिला कर्मचारी
100 मनपा कर्मचारी उपस्थित होते.
आणखी वाचा
Comments are closed.