NEET EXAM : अंधारात सरकार, अधांतरी विद्यार्थी! अंबादास दानवे यांची टीका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पेपर फुटल्यामुळे वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेली ‘नॅशनल इलिजिबिलीटी कम इन्ट्रेन्स टेस्ट’ (नीट) रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून पेपरफुटीचे सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. NTA च्या या निर्णयावरून देशभरातील विद्यार्थी प्रचंड संतापले आहेत. NTA च्या या निर्णयावरून सत्ताधाऱ्यांना देखील विरोधकांनी धारेवर धरले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व विधानपरिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ”योजनांच्या नावाखाली जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च करणाऱ्या सरकारला विद्यार्थ्यांच्या परीक्षेची पारदर्शकता मात्र टिकवता येत नाही. पेपरफुटी आणि निकालांमधील गोंधळ हे आता ‘न्यू नॉर्मल’ झालं आहे. तरुणांच्या मेहनतीपेक्षा व्यवस्थेतील पळवाटा मोठ्या झाल्या आहेत, हेच या सरकारचे सर्वात मोठे अपयश आहे” अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले की, ”मंत्री उत्तरं न देता पळ काढतात, यापेक्षा बेजबाबदार सरकार ते कोणते! सगळ्या गोष्टी देशभक्तीशी जोडणारे हे सरकार आता देशाच्या भावी पिढीला अधांतरी सोडून कोणता इतिहास लिहू पाहते आहे? असा सवाल त्यांनी X वरून केला आहे.

Comments are closed.